You are currently viewing पाप – पुण्य समज, गैरसमज

पाप – पुण्य समज, गैरसमज

 

निसर्गनियमानुसार खर पुण्य म्हणजे काय ते कसं मिळवायचं तसेच खर पाप म्हणजे काय ते टाळायचं कसं या संदर्भात *सद्गुरू श्री वामनराव पै* यांनी *पाप – पुण्य समज, गैरसमज* या ग्रंथात अचूक मार्गदर्शन केलेला आहे.

*प्रश्न १७ :- मानवी जीवनात क्रियमाण आणि नियतीचा माणसाच्या पाप-पुण्याशी व त्याच्या सुख – दुःखाशी कशा पध्दतीने संबंध येतो ?*

*उत्तर :-* *(… क्रमशः..)*

दुसरा मुद्दा असा की माणसे अनिष्ट प्रारब्ध भोगीत असताना त्यांना प्राप्त झालेल्या प्रतिकूल परिस्थितीत परिस्थितीचा योग्य तो बोध न घेता अधिकच बेफाम बनून अत्यंत अनिष्ट नियती निर्माण करण्यास कारणीभूत ठरतात .

परंतु जी माणसे अनिष्ट प्रारब्ध भोगीत असतांना प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा नम्र , प्रेमळ , प्रामाणिक व समंजसपणे प्राप्त झालेल्या परिस्थितीशी मिळते – जुळते घेऊन व तडजोड वृत्ती धारण करुन उत्तम वातावरण निर्मिती करतात , ती माणसे प्रतिकूल परिस्थितीत सुध्दा अनिष्ट प्रारब्ध भोगीत असताना इष्ट नियती निर्माण करीत असतात .

माणसाचे आयुष्य संपेपर्यंत माणसानेच निर्माण केलेली इष्टानिष्ट नियती त्याला सुख – दुःखाच्या स्वरूपात भोग देत असते .

परंतु माणसाच्या जीवनप्रवासात त्याचे आयुष्य संपल्यामुळे सुख – दुःखाच्या स्वरुपात भोगात न आलेला नियतीचा शेष भाग त्याच्या संचितात जाऊन पडतो .

*अशा तऱ्हेने संचितातून प्रारब्धाची निर्मिती , प्रारब्धातून क्रियमाण , क्रियमाणातून पाप-पुण्य व पाप-पुण्यातून नियती निर्माण होऊन नियतीचा शेष भाग संचितात जाऊन पडतो . माणसाचे जीवनचक्र अशा रीतीने चालत असते .*

*या जीवनचक्रात सापडून माणसाने चक्रम बनायचे की जीवनचक्र शुभचिंतनाच्या बोटावर धारण करुन चक्रधर व्हायचे हे ठरविण्याचे काम ज्याचे त्यानेच करावयाचे असते .*

 

*– सदगुरु श्री वामनराव पै .*

प्रतिक्रिया व्यक्त करा