You are currently viewing दिव्यज्ञान किंवा प्रतिभाज्ञान

दिव्यज्ञान किंवा प्रतिभाज्ञान

 

*प्रज्ञान म्हणजे प्रभुचे ज्ञान, देवाचे ज्ञान, आत्मज्ञान, आत्मसाक्षात्कार!* हे ज्ञान फार महत्त्वाचे आहे. कारण *माणसाच्या जन्माचे सार्थक ह्या ज्ञानाने होते.*

तुकाराम महाराज सागतात, …..

*तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक ।*

*विठ्ठलचि एक देखिलिया ।।*

*ज्यावेळी आपल्याला देवाची गाठ पडते, भेट, दर्शन होते व देवाचा साक्षात्कार होतो तेव्हां माणसाच्या जन्माला आल्याचे सार्थक होते.*

म्हणून माणूस जन्माला कशासाठी आला ?

*ज्यानी आपल्याला जन्माला घातलं, मानवी शरीर दिलं ह्याचा त्याला साक्षात्कार व्हायला पाहिजे.*

मानवी शरीराबद्दल लोक म्हणतात की ते केवळ निसर्गदत्त आहे. पण शरीराकडे नीट पाहिले तर त्याच्यामध्ये किती घटक आहेत ते लक्षात येईल. *त्याच्या ठिकाणी पंचमहाभूते, पंचज्ञानेंद्रिये, पंचकर्मेद्रिये, पंचतन्मात्रा, सप्तधातू, त्रिगुण, हाडे, मांस इतके घटक आहेत व ह्या सर्वांना एकत्र धरून ठेवणं हा महत्त्वाचा भाग आहे.*

ह्या सर्वांचे नियंत्रण, संघटन शरीराचे ठिकाणी होऊन राहिले आहे ही महत्त्वाची गोष्ट आहे. *जन्म होतो तेव्हां संघटन होते व मृत्यू होतो तेव्हां विघटन होते.* हे सर्व निसर्गनियमांप्रमाणे चाललेले आहे.

*हे संघटन (Co-ordination) करणाऱ्याला आपण ”आत्मा” म्हणतो,* म्हणून जो हे सर्व करतोय त्याचे ज्ञान व्हायला पाहिजे. शिवाय तो आपल्या ठिकाणीच आहे. *इतकेच नव्हे तर ”तो” आपणच आहोत.*

परंतु गंमत म्हणजे आपल्याला त्याचा पत्ता नाही. कारण अजाणतेपणे, नेणीवपूर्वक कार्य होत असते. *अशा प्रकारे संघटन व विघटन करणारा आत्मा, ज्याला आत्मशक्ती, आत्मदेव, आत्माराम म्हणतात. ह्याचे ज्यावेळी ज्ञान होते, त्याला प्रतिभाज्ञान किंवा ऋतुंबरा प्रज्ञा म्हणतात.*

*✅ ऋतुंबरा प्रज्ञेला देवाचा साक्षात्कार होतो. म्हणून प्रज्ञान असे म्हणतात.*

✅हे सर्व ज्ञानाचे प्रकार समजून घेतले पाहिजेत. *जाणीव कशी विस्तारीत जाते, स्फुरत जाते, जीवन कसे व्यापत जाते हे, प्रगट होत जाते, हे जेव्हा कळेल तेव्हा “सुखी जीवनाची गुरूकिल्ली” हातात येईल.*

 

*— सद्गुरु श्री. वामनराव पै.*

प्रतिक्रिया व्यक्त करा