सिंधुदुर्ग जिल्ह्यात २४,२५ व २६ फेब्रुवारी रोजी एमएसएमईचा उद्योग मेळावा होणार आहे. यावेळी केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे सेक्रेटरी हे सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने काम सुरु असून यादृष्टिने सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबविण्यात येणार आहेत. केरळच्या धर्तीवर सगळ्या योजना कोकणात राबविल्या जाणार आहेत. यावेळी कोकणातील उत्पादने आणि त्यावरचे प्रक्रिया उद्योग या बद्दलची माहिती दिली जाईल. त्या संदर्भातील प्रात्यक्षिकही दाखविले जाणार आहे. या पार्श्वभूमिवर कुडाळ परिसरात युनिट सुरू केले जाणार आहे. जास्तीत जास्त उद्योग सुरू करून देशात आर्थिक उन्नती आणण्याचा हा प्रयत्न आहे. केंद्रीय उद्योग मंत्रालयाचे सेक्रेटरी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार असल्याची घोषणा यापुर्वीच केंद्रीय सुक्ष्म, लघु व मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केली होती. मात्र जानेवारीत होणारा हा उपक्रम कोरोनाच्या लाटेमुळे पुढे नेण्यात आल्याची माहीती देण्यात आली आहे.
हा उपक्रम २१ ते २३ जानेवारी दरम्यान सिंधुदुर्गात करण्याबाबत नियोजन सुरु होते. या उपक्रमात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या दोन जिल्ह्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या योजना येणार आहेत. केरळच्या धर्तीवर सगळ्या योजना कोकणात आणणार असून कोकणातील उत्पादने आणि त्यावरचे प्रक्रिया उद्योग या बद्दलची माहिती दिली जाईल. त्या संदर्भातील प्रात्यक्षिकही दिले जाणार आहे. या पार्श्वभूमिवर कुडाळ परिसरात युनिट सुरू केले जाणार आहे. जास्तीत जास्त उद्योग सुरू करून देशात आर्थिक उन्नती आणण्याचा आणि माझ्या खात्याच्या माध्यमातून देशाचा जीडीपी वाढविण्याचा प्रयत्न आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत देश आत्मनिर्भर होण्याच्या दिशेने आम्ही काम करत आहे असे ना. नारायण राणे यांनी म्हटले आहे.