You are currently viewing अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; संशयित आरोपीस अटक

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार ; संशयित आरोपीस अटक

इचलकरंजी

शहरात लग्नाचे अमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी निखिल घाटगे या संशयित आरोपीस ताब्यात घेवून अटक केली.
या प्रकरणी पिडीत मुलीच्या आईने तक्रार दाखल केली आहे.

इचलकरंजी शहरातील
17 वर्षीय अल्पवयीन मुलगी खरेदीच्या निमित्ताने घरातून बाहेर पडली होती. बराच वेळ झाली तरी ती घरी न आल्याने पिडीत मुलीच्या आईने तिला अज्ञाताने पळवून नेल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसात तक्रार दाखल केली होती. पोलिसांकडून या प्रकरणाचा तपास सुरु असताना 16 जानेवारी रोजी पिडीत मुलगी मिळून आली. लग्नाचे अमिष दाखवून निखिल घाटगे याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले. त्यामुळे संशयित आरोपी निखिल
घाटगे याला अटक करण्यात आली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन पाटील करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 × one =