✒️ *प्रकरण : व्यसन.*
*विकत घेतलेली पीडा म्हणजे व्यसन.* दैन्य,दुःख,दारिद्र्य व रोग यांना दिलेले खास आमंत्रण म्हणजे व्यसन.व्यसनाधीन माणसे शेपूट तुटलेल्या कोल्ह्यासारखी असतात आणि म्हणूनच निर्व्यसनी माणसांना व्यसनी करण्यासाठी ते सदैव टपलेले असतात.
🎯 *1.”व्यसनाधीन माणसे स्वत:च्या हातांनी स्वत:च्या संसाराला आग लावून आपल्या बायका-पोरांना दु:खाच्या खाईत लोटतात,हे प्रत्यक्ष पाहूनसुद्धा इतर लोक त्याच मार्गाचा अवलंब करतात’,हे जगातील सर्वात मोठे आश्चर्य होय.*
🎯 *2. जो मित्र आपल्याला व्यसनाधीन करण्याचा प्रयत्न करतो,तो मित्र नसून सात जन्माचा शत्रू आहे हे ओळखून व वेळीच सावध होऊन त्याच्यापासून सात पावले दूर रहाण्यात माणसाचे खरे हित आहे.*
🎯 *3. ‘फुकट मिळते ते गिळायचे’ ही प्रवृत्तीच माणसांना व्यसनाधीन करण्यास कारणीभूत ठरते.*
🎯 *4. थोडी थोडी’ करता करता ‘दारूची गोडी कधी लागली व जीवनाची गाडी रूळावरून कधी घसरली’ हे ह्या गड्याला कळलंही नाही.*
🎯 *5.भीड भिकेची बहीण’ हे सत्य लक्षात घेऊन व्यसनी माणसांची भीड न बाळगण्यात माणसाचे खरे कल्याण आहे.*
🎯 *6.व्यसनाधीन होऊन दुःखाचा विसर पडत तर नाहीच,उलट त्या व्यसनातून दुःखाचा प्रचंड सागर निर्माण होऊन माणसे संसारासकट त्यात बुडून मरतात.*
🎯 *9.गलिच्छ व्यसनांच्या आधीन होऊन शरीराचे गटार करणे किंवा ईश्वरभक्ती करून शरीराचे मंदिर करणे हे सर्वस्वी माणसाच्या स्वाधीन आहे.*
🎯 *10.मन माझ्या स्वाधीन आहे असे म्हणतच माणूस व्यसनाधीन होतो.*
🎯 *11.प्रपंचात स्वास्थ्य प्राप्त झालेले लोक जर परमार्थाकडे वळले नाहीत तर ते जीवनात अस्वस्थ होऊन व्यसनाधीन होण्याची दाट शक्यता असते.*
🎯 *12.व्यसन म्हणजे दैन्य, दु:ख, दारिद्र्य व रोग यांना आग्रहाचे खास निमंत्रण होय.*
🎯 *13.”मन माझ्या ताब्यात आहे’ असे म्हणणारी माणसे व्यसनांच्या ताब्यात कधी जातात व तोबा तोबा म्हणण्याची पाळी त्यांच्यावर कधी येते,हे त्यांना समजतही नाही.*
🎯 *14.दारूच्या पेल्यात दुःख बुडत तर नाहीच उलट त्याच दारूच्या पेल्यातून दुःखाचा अजगर निर्माण होऊन तो व्यसनाधीन माणसांना त्यांच्या संसारासकट गिळून टाकतो.*
🎯 *15.दुःख विसरण्यासाठी व्यसनाधीन होणे हा मार्ग नसून ईश्वर स्मरण करणे हाच खरा मार्ग होय.*
🎯 *16.व्यसन म्हणजे दुःखाला आमंत्रण.*
🎯 *17.माणूस प्रथम दारूला गिळतो व नंतर दारूच अक्राळ विक्राळ स्वरूप धारण करून माणसाला त्याच्या संसारासकट पूर्ण गिळून टाकते.*
🎯 *18.जगात सर्वात मोठे आश्चर्य हे की इतरांना दारूच्या व्यसनाधीन होऊन स्वत:च्या संसाराची स्वत:च्या हाताने अक्षरशः राखरांगोळी करताना पाहून सुद्धा लोक त्याच मार्गाने जातात.*
🎯 *19.समाज पुरुषाला जडलेला कॅन्सर म्हणजे व्यसन.*
~ सद्गुरु श्री. वामनराव पै.