You are currently viewing स्वाभिमानीच्या महाआरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वाभिमानीच्या महाआरोग्य तपासणी शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद

इचलकरंजी

इचलकरंजी शहरातील आसरानगर परिसरात
शिवार सामाजिक विकास संस्था व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या मोफत महाआरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरासाठी सेवासदन रुग्णालय व नारायणी रुग्णालय यांचे अनमोल सहकार्य लाभले.या शिबीराचे उदघाटन स्वाभिमानी पक्षाचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्वाभिमानी पक्ष व संघटनेचे पदाधिकारी व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कष्टकऱ्यांचे नेते म्हणून राज्यात नव्हेतर देशात परिचित असलेले ,प्रस्थापितांविरोधात लढा देणारे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली
स्वाभिमानी शेतकरी संघटना ,स्वाभिमानी पक्षाच्या माध्यमातून शेतकऱ्यांबरोबरचबरोबरच सर्वसामान्य जनतेच्या न्याय – हक्कासाठी सातत्याने प्रयत्न केला जातो. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेबरोबरच स्वाभिमानी पक्षाची समाजमनात मोठी विश्वासार्हता निर्माण झाली आहे.समाजात आरोग्य जनजागृती होवून सर्वसामान्य नागरिकांना विविध आजारांवर मोफत आरोग्य तपासणी करुन उपचार घेता यावेत ,याच सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून शिवार सामाजिक विकास व संशोधन ,स्वाभिमानी शेतकरी संघटना ,स्वाभिमानी पक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने इचलकरंजी शहरातील आसरानगर परिसर सिध्दीविनायक मंदिर याठिकाणी मोफत महाआरोग्य तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी संयोजक अभिषेक पाटील , स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सागर संबूशेटे ,जिल्हा उपाध्यक्ष गोवर्धन दबडे ,इचलकरंजी शहराध्यक्ष बसगोंडा बिरादार ,अण्णासाहेब शहापूरे ,सतीश मगदूम यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी माजी खासदार राजू शेट्टी यांनी आजच्या काळात सामाजिक बांधिलकी समजून जनतेचे आरोग्य जपणे अत्यंत गरजेचे बनले आहे.याच जाणीवेतून मोफत महाआरोग्य तपासणी शिबीर आयोजित करुन समाजासमोर चांगला आदर्श निर्माण केल्याचे गौरवोद्गार काढून अशा समाजोपयोगी उपक्रमास माझे मोठे सहकार्य राहिल ,अशी त्यांनी ग्वाही दिली.यावेळी विविध मान्यवरांनी देखील या उपक्रमाचे कौतुक करत यातून इतरांनी देखील प्रेरणा घेवून विधायक कार्यासाठी प्रयत्नशील रहावे ,असे आवाहन केले.
यावेळी सेवा सदन रुग्णालय व नारायणी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी व पथकाव्दारे सहभागी रुग्णांची ई.सी.जी.तपासणीबरोबरच
नेत्र ,मूत्रविकार ,जनरल व मधुमेह तपासणी करुन आवश्यकतेनुसार औषधोपचार करण्यात आले.तसेच वैद्यकीय तज्ञांनी आरोग्य तंदुरुस्त राहण्यासाठी घ्यावयाची काळजी आणि शरीराच्या तक्रारींकडे दुर्लक्ष न करता वेळीच तज्ञ डॉक्टरांकडे आरोग्य तपासणी करुन घेवून त्यांच्या सल्यानुसार औषधोपचार घ्यावेत ,असे अभ्यासपूर्ण मौलिक मार्गदर्शन केले. या महा आरोग्य तपासणी
शिबीरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.यावेळी स्वाभिमानीचे गणेश बागडे ,विकास चौगुले ,हेमंत वणकुंद्रे ,अर्जुन बागडे ,अरिहंत कुपवाडे , निव्रुत्ती शिरगुरे ,बाळगोंडा पाटील ,संजय बेडक्याळे , महावीर बेडक्याळे ,रावसाहेब देवमोरे ,अविनाश कोरे ,दीपक माछरे यांच्यासह वैद्यकीय अधिकारी ,कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा