गोड बोलणा आमका
कोकणातल्या मातीनच
दिला गे बाय ..
मगे तिळगुळ घेऊन गोड
बोलायची गरजच काय ?
वरसून फणसासारखो
काटेरी दिसलो तरी
भुतुर गोड सोन्यासारखो
आसता गे बाय ..
मगे तिळगुळ घेऊन
गोड बोलाची गरजच काय ?
अडल्या पडलेल्यांच्या
हाकेक हाक देता ..
कधी बोलावलास तरी
आसात तसो धावान जाता..
देवासारखो पाठी उभो
रवता गे बाय ..
मगे तिळगुळ घेवन गोड
बोलाची गरजच काय ?
एखाद्याक जीव लावल्यानं
तर काळीज काढून देता ..
वरवर नाय, मनापासून
सगळा करता ..
बघून डोळ्यात पाणी
भरता गे बाय ..
मगे तिळगुळ घेवन गोड
बोलाची गरजच काय ?
गरम मसाल्यासारखो
वरवर तिखट दिसलो तरी ..
काळीज रसरशीत हापूस पायरी ..
सगळ्यांनी त्येचो अनुभव
घेतल्यानी गे बाय ..
मगे तिळगुळ घेवन गोड
बोलाची गरजच काय ?
मालवणी माणसा बद्दल
बोलशीत तितक्या थोडा
कसो घडलो ह्या सगळ्यांका
पडला कोडा ..
नारळातल्या पाण्याचा
साक्षात अमृत गे बाय ..
मगे तिळगुळ घेवन गोड
बोलाची गरजच काय ?
मालवणी माणसा बरोबर
दोस्ती केलास काय होतला
सगळ्यांचा भला ..
तुम्ही पण शिकतलास गोड
बोलण्याची कला ..
मी सांगतयता विश्वातला
सत्य आसा गे बाय ..
मगे तिळगुळ घेवन गोड
बोलाची गरजच काय ??
— जी. एस. परब