देवगड
देवगड जामसंडे नगरपंचायत च्या उर्वरित चार प्रभागातील निवडणूक १८ जाने. रोजी होत असून सोमवारी सकाळी चारही प्रभागातील मतदान केंद्रावर अधिकारी कर्मचारी रवाना झाले आहेत.या चार प्रभागाकरिता चार मतदान केंद्रावर प्रत्येकी ६ कर्मचारी यात मतदान अधिकारी,पोलीस शिपाई या प्रमाणे २४ कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
देवगड जामसंडे न.प.निवडणुकीत प्रभाग क्रमांक ०४, (सर्वसाधारण महिला )-१)घाडी मनीषा अनिल , २)भडसाळे मृणाली महेश, प्रभाग क्रमांक ०५,(सर्वसाधारण महिला)१)कुळकर्णी सुजाता उमेश ,
२)जामसंडेकर ,मनीषा अनिल, प्रभाग क्रमांक ०७ (सर्वसाधारण) यात १)खेडेकर रोहन विश्वनाथ , २)चांदोस्कर योगेश प्रकाश३),कणेरकर प्रफुल्ल भिकाजी, ४)कुळकर्णी सौरभ सुर्यकांत,५)मेस्त्री राजेंद्र बाळकृष्ण
प्रभाग क्रमांक ०८(सर्वसाधारण ) यामधून १)तारी संतोष रवींद्र ,२) पारकर निधी नयन,३)नाडणकर प्रणव चंद्रकांत,हे तीन उमेदवार रिंगणात आहेत .
प्रभाग क्र ७ मधून सर्वाधिक ५ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर त्या खालोखाल प्रभाग क्र ८ मधून ३उमेदवारी निवडणूक रिंगणात आहेत.मतदान १८ जाने ७.३० ते ५.३० या वेळात पार पडणार असून मतमोजणी दि १९ जाने. रोजी सकाळी १० वा. पासून देवगड तहसीलदार कार्यालयात सुरू होणार आहे .
एकूण ५ फेरीत मतमोजणी करण्यात येणार आहेत .एकूण ४ टेबलावर मतमोजणी होणार असून प्रत्येकी ४ प्रभागाचे निकाल एका फेरीत अपेक्षित आहेत.देवगड जामसंडे नगरपंचायत च्या उर्वरित चार प्रभागाच्या निवडणुकीकरिता निवडणूक निर्वाचन अधिकारी देवेंद्र तामोरे,मुख्यधिकारी कौस्तुभ गव्हाणे,तहसीलदार मारुती कांबळे ,पोलीस निरीक्षक नीलकंठ बगळे ,सर्व प्रशासकीय ,तसेच पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.