*ना. एकनाथ शिंदे यांनी आ. वैभव नाईक यांची मागणी केली पूर्ण*
*शासनाकडून ४९ लाख ५० हजार रु निधी वितरित*
कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून मालवण नगरपरिषदेसाठी अग्निशमन बंब मंजूर करून घेतला आहे. १४ जानेवारीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्र अग्निसुरक्षा अभियानांतर्गत मालवण नगरपरिषदेचा समावेश करून १ अग्निशमन वाहन खरेदी करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. अग्निशमन वाहन खरेदीकरीता रू. ५५ लाख इतका खर्च अनुज्ञेय आहे. त्यापैकी शासन हिस्स्याचे (९०%) रक्कम रु. ४९ लाख ५० हजार इतक्या रक्कमेस प्रशासकीय मान्यता देऊन वितरित करण्यात आली आहे. उर्वरित १० टक्के म्हणजेच ५ लाख ५० हजार रु. हि रक्कम नगरपरिषदेने अदा करावयाची असून याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.
मालवण नगरपरिषदेचा अग्निशमन बंब नादुरुस्त झाल्याने गेले काही महिने आगीच्या घडणाऱ्या घटनेवेळी गैरसोय होत होती. प्रसंगी जिल्ह्यातील इतर तालुक्यातून अग्निशमन बंब पाचारण करावे लागत होते. त्यामुळे नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, उपजिल्हाप्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, शिवसेना नगरसेवक मंदार केणी,पंकज सादये, यतीन खोत, सेजल परब, तृप्ती मयेकर, सुनीता जाधव, शिला गिरकर, दर्शना कासवकर, आकांक्षा शिरपुटे यांनी तसेच मालवण वासियांनी आमदार वैभव नाईक यांच्याकडे मालवण नगरपरिषदेसाठी सुसज्ज अग्निशमन यंत्रणा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. या मागणीची दखल घेऊन नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव शासन स्तरावर पाठविल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून मालवण नगरपरिषदेसाठी अग्निशमन बंब मंजूर करून घेतला आहे. लवकरच या अग्निशमन बंबासाठी टेंडर प्रक्रिया राबवून मालवण वासियांच्या सेवेत अग्निशमन बंब रुजू केला जाणार आहे. असे आ.वैभव नाईक यांनी सांगितले आहे.