गणेश चतुर्थीला चार दिवस असताना शेवटचा हात फिरवताना मूर्तिकार बाबली नाईक.
गणेश चतुर्थी तोंडावर आली असताना श्री गणेश चित्र शाळांमध्ये मूर्तिकार मोठ्या लगबगीने काम करत असताना दिसतात. अशाच एका आकेरीतील राधाकृष्ण ( बाबली) नाईक यांच्या श्री गणेश चित्र शाळेत सद्या पहावयास मिळत आहे. स्वतः बाबली नाईक हे गेली २७ ते २८ वर्षे ही गणेश चित्र शाळा चालवत आहेत. त्यांच्या शाळेत गोवा पासून ते वैभववाडी पर्यंतचे भाविक गणपतीच्या मूर्ती नेतात. मात्र यंदाच्या प्रादुर्भाव परिस्थितीमुळे सुमारे १०० मुर्त्यांची मागणी कमी झाली असे त्यांनी सांगितले.त्यांच्या सोबत त्यांचा मुलगा सुद्धा या कलेस हातभार लावतो. तसेच ते स्वतः एक नामवंत नाट्यकलाकर असून दशावतार कम्पन्यांमध्ये सुद्धा काम करतात.