You are currently viewing सिंधुदुर्गातील माजी सैनिकांना आता उद्योजक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू – सुधीर सावंत

सिंधुदुर्गातील माजी सैनिकांना आता उद्योजक बनविण्यासाठी प्रयत्न सुरू – सुधीर सावंत

माडखोल येथे आर.जे. सिक्युरिटी प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन…

सावंतवाडी

माजी सैनिकांना उद्योजक म्हणून यशस्वी करण्यासाठी सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून आवश्यक असलेले उपक्रम राबविण्यात येतील. त्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत,असा विश्वास ब्रिगेडियर तथा माजी खासदार सुधीर सावंत यांनी आज येथे व्यक्त केला. दरम्यान सैनिकांना फक्त पस्तीस वर्षात रिटायर्ड करू नका, तर त्यांचा फायदा अन्य सेवामध्ये करून घ्या, त्यांना सन्मान द्या, अशी मागणी आपण केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग यांच्याकडे केली असल्याचे त्यांनी सांगितले. माडखोल येथे सुरु करण्यात आलेल्या आर.जे. सुरक्षारक्षक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन श्री सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी ते बोलत होते.

याप्रसंगी तहसीलदार राजाराम म्हात्रे, सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष टि.पी.परब, सरपंच संजय शिरसाट, अशोक म्हाडगुत, दिलीप राऊळ, जॉकी डिसोजा, धनंजय राऊळ, अरुण म्हाडगुत आदी उपस्थित होते.

श्री. सावंत म्हणाले, भारतीय सेनेने कायमच प्रामाणिकपणे सेवा केली. सैनिकांनी देशाची सेवा करुन कायमच मान उंचावली आहे. सैनिकांनी देशसेवा करताना आपत्कालीन परिस्थितीत धाव घेतली. आतंकवाद्यांचा खतमा करण्यासाठी सैनिकांनी कायम पुढाकार घेतला. आतंकवाद्यांना धडा शिकवला. तसेच वृक्षारोपण केल्यानंतर झाडे किती जगली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात इकाॅलाॅजीक टास्क फोर्स निर्माण करत दहा लाख झाडे लावली पाहिजेत. त्यासाठी सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून राज्यात सरकारच्या मदतीने झाडं लावली जाणार आहेत. असे त्यांनी सांगितले.

सिंधुदुर्ग सैनिक स्कूल निर्माण करून देशसेवा करायची संधी दिली आहे. सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून मुलं भारतीय सैन्यात अधिकारी होतील, तसे प्रशिक्षण दिले जात आहे. तसेच केंद्र सिंधुदुर्ग जिल्ह्यात निर्माण केले जाईल. सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून उद्योजक निर्माण झाले पाहिजेत म्हणून प्रयत्न केले गेले पाहिजे, तसा प्रस्ताव सैनिक कल्याण मंत्र्यांकडे ठेवला आहे. तर माजी सैनिक कल्याणासाठी १ हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. सैनिक कल्याणासाठी मुलांच्या वसतिगृहातासह विविध उपक्रम हाती घेतले पाहिजेत. पंधरा मागण्या आहेत येत्या १५ मार्च पर्यंत मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर आंदोलन केले जाईल. सैनिक सरकारी नोकर असल्याने त्यांना ५८ वर्षांपर्यंत नोकरी मिळाली पाहिजे, सैनिक सैन्यात असताना शासकीय सेवेत घेतले पाहिजे प्रशिक्षण दिले पाहिजे. राज्यात सैनिकांसाठी आरक्षित असलेल्या जागी शासकीय नोकरीत सामावून घेतले पाहिजे, राज्यातील एक कोटीहून अधिक नोकऱ्यावर गदा आली आहे. खाजगीकरणामुळे कामगार, माजी सैनिक यांना नोकरी शक्य नसली तरी प्रशिक्षण महत्त्वाचे आहे. असे अनेक मुद्दे त्यांनी  मांडले.

प्रतिक्रिया व्यक्त करा