You are currently viewing #जगा आणि जगू द्या#

#जगा आणि जगू द्या#

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली संस्थापक अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अहमद मुंडे यांचा लेख

माणसाने माणसाशी कसे वागल पाहिजे हे शिकविण्याचे काम मानवाधिकार आयोग करत असतो. आणि ही मानवधिकाराची सर्वाधिक उत्तम आशय असणारी व्याख्या आहे. कोणत्याही ठिकाणी जर माणूस माणसाशी माणूस म्हणून वागत नसेल तर त्याठिकाणी मानवधिकाराचे हनन होते. हे आपल्या ध्यानात पकके येते. जगा आणि जगू द्या हे मानवाधिकाराचे मानवी मुल्य आहे मानवाधिकार कार्यकर्ते यांनी ही बाब कायम ध्यानात ठेवण्याची आज गरज आहे. समाजातील इतर व्यक्ती जशा सन्माने जातात किंवा आपणांस जर सन्माने जगाव अस वाटत तर समाजातील इतर घटकांना सुध्दा सन्माने जगण्याचा अधिकार आहे. असे थोडे विस्ताराने आपण सर्वांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे. आज आपणं बघतो आपल्या आजूबाजूला सर्वसामान्य माणसाला गोरगरीब जनतेला महिला वंचित घटक यांना आपले दैनंदिन जीवन जगत असताना मानवीय अडथळे बरेच येत आहेत. म्हणजे राजकारणी दबाव. शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकडून मानसिक त्रास आर्थिक लुट लुबाडणूक अशी विविध प्रकरणे यासाठी लढा उभा करणे म्हणजे माणसाच्या अधिकारासाठी कोणताही पक्षपाती पणा न करता धावून जाणे होय यासाठी मानवाधिकार आयोगाचे कार्यकर्ते यांचे परम कर्तव्य आहे
माणवी हक्काच्या रक्षणासाठी व मानवीय प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी व संवर्धन हे कार्य करणार्या कार्यकर्ते यांना मानवी हकक या संकल्पनेचा प्राथमिक परिचय व्हावा यासाठी कार्यकर्ते यांचें मार्गदर्शन शिबिर घेणे गरजेचे आहे यामुळे बर्याच सोप्या आणि सुलभ पद्धतीने मानवाधिकार समजणे सोप होईल
* मानवी अधिकारांचा वैश्विक जाहीरनामा संयुक्त राष्ट्रे १९४८
* भारतीय संविधान आणि मानवाधिकार यांचा संबंध
* राष्ट्रीय व राज्य मानवाधिकार आयोग यांचेकडे तक्रार कशी आणि कोठे करावी
* मानवाधिकार व पोलीसांची भूमिका
* भारतीय संविधानाच्या दृष्टिकोन यातून नागरिकांची कर्तव्ये
या पाच महत्वाच्या गोष्टी कार्यकर्ते यांना समजावून घेणे सोप होईल त्यामुळे त्यांना मानवाधिकार आयोगाचे काम करताना कोणतीही अडचण येणार नाही मानवाधिकार कार्यकर्ते यांना आपले मानवाधिकाराचे काम किती व्यापक व सखोल आहे याची जाणीव होण्यास मदत होईल
माणसाच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत पर्यंत म्हणजेच बालक. स्त्रिया. कामगार. श्रमिक. शेतकरी. शेतमजूर. भूमीहीन सामाजिक न्यायापासून वंचित असणारे घटक. अनुसूचित जाती जमाती. तसेच आदिवासी व भटके. अल्पसंख्याक. अल्पभाषीक आणि साधन संपत्तीपासून वंचित असणारे लोक यांना अन्न वस्त्र निवारा शैक्षणिक वैद्यकीय सामाजिक आर्थिक या गरजा पूर्ण होण्याचा हक्क तसेच रोजगाराचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे अशी संविधानिक तरतूद आहे. जे जनतेचे हक्क व अधिकार आहेत ते जनतेच्या पदरांत पडलेच पाहीजेत यासाठी लढा उभा करण्यासाठी एकमेव माध्यम आहे ते म्हणजे मानवाधिकार गुंडगिरी. अवैध धंदे दहशतवादी कायदेभंगातील दोषी व्यक्तिला कायदेशीर तरतुदी प्रमाणे कायद्यानुसार व प्रशासन यंत्रणा माध्यमातून योग्य ते शासन झालेच पाहिजे हे अगदी खरे आहे पण आज वाढत असलेला राजकीय दबाव. वाढती गुन्हेगारी अपराधी व्यक्तिचे ही दंडशकतिकडून मानवीय अधिकाराचे हनन झालेच नाही पाहिजे. इतका मानवाधिकार कार्यकर्ते व जनतेच्या मनात व्याप्ती व्यापक झाली पाहिजे. आणि मुळात हे सर्व मानवाधिकार कार्यकर्ते यांना कळले पाहिजे
‌. समाजात नेहमी सबल घटक दुर्बल घटकातील लोकांचे शोषण करतात यातच मानवी हक्कांचे सुरवातीला हनन होते मग व्यक्तिची प्रतिष्ठा बळी दिली जाते. माणसांचे हक्क आणि प्रतिष्ठा नाकारली की व्यक्ती गुलाम होतो आणि मग गुलामाचे आर्थिक सामाजिक व राजकीय असे चारी बाजूंनी शोषण केले जाते आणि ते सोपे होऊन जाते. मानव अधिकारांची लढाई लढताना फक्त अधिकारावरच भर देऊन चालणारं नाही त्यामुळे आपण आपले मानवीय कर्तव्य विसरलो तर अधिकारांची लढाई कधीचं जिकंता येणार नाही त्यामुळे मानव अधिकार कार्यकर्ते यांनी व्यक्ति म्हणून एक नागरिक म्हणून आपली कर्तव्य जबाबदारी पूर्ण केली पाहिजे व्यक्तिचे कर्तव्य आणि अधिकार हया एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत
आज रेशन घोटाळा.बोगस कामगार नोंदणी घोटाळा. आर्थिक विकास महामंडळ कर्ज वितरण करताना होणारा नाहक त्रास. शासकीय अधिकारी व कागदपत्रे पूर्ण असून सुद्धा पैशासाठी कामांत हालगरजी पणा. जळीत प्रकरणं पंचनामा होणारा उशीर सापेक्ष पंचनामा न होणे. आत्महत्या. बलात्कार छेडछाड प्रकरणांत सदर पोलिस स्टेशनला तक्रार घेण्यास टाळाटाळ. कामगारांना होणारी माराहान. दैनंदिन जीवनात लागणार्या वस्तूंचे भाव निश्चित करणेबाबत. दवाखान्यात डॉ यांचेकडून आकारले जाणारे बेमाफी बील. औषधांच्या मनमानी किंमती अशा विविध समस्यांविषयी तुम्ही कोणतीही मनात भीती न बाळगता आमच्याकडे तक्रार करू शकता तुमचा मुद्दा बरोबर असेल तर न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्न करु
तक्रार लेखी स्वरूपात देणे बंधनकारक आहे
‌‌. समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा