You are currently viewing “जीवनामृत “

“जीवनामृत “

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री ज्योत्स्ना तानवडे यांची साकव्य अष्टाक्षरी स्पर्धेत सर्वोत्कृष्ट सन्मान प्राप्त काव्यरचना

थेंब थेंब हा पाण्याचा
हिऱ्या मोत्याच्या तोलाचा
जपू त्याला जीवापाड
खरा आधार जीवाचा ||

पाण्यासाठी डोळा पाणी
पाण्याविना होई ऱ्हास
पाणी रक्षी जीवनास
रक्षू आपण पाण्यास ||

पाणी हवे जगण्याला
कोंब उगे जळापोटी
पाणी अडवूनी भरू
माय धरणीची ओटी ||

पावसाच्या धारांतुनी
करी जीवन संवाद
चराचरा व्यापितसे
माय धरेचा आनंद ||

ध्यानीमनी जपू एक
मंत्र खास प्रगतीचा
पाणी अडवू जिरवू
मार्ग राष्ट्र विकासाचा ||

ज्योत्स्ना तानवडे.
पुणे.५८

प्रतिक्रिया व्यक्त करा