पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत योगिता प्रकाश काळे, खुशी गजानन गावनेर, प्रियदर्शनी भरडकर यांना यश
वैभववाडी:
पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत योगिता प्रकाश काळे(कोकिसरे) या विद्यार्थ्यीनीने ६४.६७ टक्के गुणांसह तालुक्यात प्रथम तर जिल्ह्याच्या ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ता यादीत १२ वा क्रमांक पटकावला. तर खुशी गजानन गावनेर(हेत) ही विद्यार्थीनी ५६.६६ टक्के गुण मिळवून तालुक्यात द्वीतीय आली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यामार्फत ऑगस्ट २०२१ मध्ये पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेच्या गुणवत्ता यादीत तालुक्यातील सात विद्यार्थ्यांनी स्थान पटकावले आहे. त्यामध्ये मराठी माध्यमातील सहा तर उर्दू माध्यमाच्या एका विद्यार्थीनीचा समावेश आहे.
तालुक्याच्या गुणवत्ता यादीत स्थान पटकावलेले विद्यार्थी पुढीलप्रमाणे: योगीता प्रकाश काळे(६४.६७ टक्के), खुशी गजानन गावनेर(५६.६७ टक्के), यश हर्षवर्धन कांबळे(५५.३३ टक्के), तनिश अमित खानविलकर(५४.६७ टक्के), उमिय्या साजीद पाटणकर(५४.६७ टक्के), श्रृती संतोष गुरव(५२ टक्के), प्रियदर्शीनी संतोष भरडकर(५० टक्के) यांनी यश मिळविले.
शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचे सभापती अक्षता डाफळे, उपसभापती अरविंद रावराणे, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे तसेच शाळा प्रशासनातर्फे अभिनंदन केले जात आहे.