You are currently viewing आमदार नितेश राणे आणि आरिफ बगदादी ठरले अशोक अनभवनेंसाठी देवदूत…

आमदार नितेश राणे आणि आरिफ बगदादी ठरले अशोक अनभवनेंसाठी देवदूत…

स्वाभिमान ट्रस्ट मार्फत लाखोंची बायपास शस्त्रक्रिया झाली अगदी मोफत

सर्वसामान्य जनतेच्या हाकेला नेहमीच धावून येणारे आमदार नितेश राणे यांनी आपल्या स्वाभिमान ट्रस्ट मार्फत परत एकदा आपल्या समाजाभिमुख कार्याचा दाखला समाजासमोर ठेवला आहे. एका तातडीने बायपास सर्जरी करण्याची गरज असलेल्या व्यक्तीला स्वाभिमान ट्रस्ट मार्फत मोफत उपचार करून पुनर्जीवन देण्यात आलं. या कामी भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी यांचे कार्य लाखमोलाचे आहे. आरिफ बगदादी यांच्यामार्फतच त्या व्यक्तीचा स्वाभिमान ट्रस्टशी संपर्क झाला आणि लाखोंची शस्त्रक्रिया अगदी मोफत झाली.

पडेल गावातील मधली वाडी येथे राहणारे अशोक आत्माराम अनभवणे यांना हृदयविकाराचा त्रास होता. चौकशी केल्यानंतर डॉक्टरांच्या म्हणण्याप्रमाणे त्यांना बायपास करणं गरजेचं होतं. त्यांच्या परिस्थितीनुसार त्यांना ते करता येत नव्हतं. म्हणून त्यांनी माहिती घेऊन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी यांच्याशी संपर्क केला. बगदादी यांनी त्यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि त्यांचा स्वाभिमान ट्रस्टशी संपर्क साधून दिला. आमदार नितेश राणे यांचे स्वाभिमान ट्रस्ट चालवणारे मुंबई येथील जावेद खान यांच्याकडे त्यांना पाठवले. त्यानंतर जावेद खान यांनी अनभवणे यांना बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून घेतलं आणि सहा लाखाचं पॅकेज देऊन त्यांची बायपास सर्जरी अगदी मोफत करण्यात आली. शारीरिक स्थितीत सुधारणा होताच त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. बायपास सर्जरी म्हणजे अगदी गुंतागुंतीची आणि खर्चिक शस्त्रक्रिया. परंतु आमदार नितेश राणे आणि भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी यांच्यामुळे ही शस्त्रक्रिया मोफत आणि यशस्वी झाली. त्यामुळे अशोक अनभवणे यांनी आमदार नितेश राणे, केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच जावेद खान, फैमिदा मॅडम आणि आरिफ बगदादी यांचे आभार मानले आणि त्यांच्या त्यांना दीर्घायुष्य लाभो आणि त्यांच्या हातून अशीच गोरगरिबांची कामे होत राहोत, अशी प्रार्थना केली आहे.

भाजपा जिल्हा सरचिटणीस आरिफ बगदादी यांनी आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान ट्रस्टच्या माध्यमातून आणि जावेद खान, फैमीदा मॅडम यांच्या सहकार्याने अशा दहा ते बारा जणांची बायपास सर्जरी, कँसर, कंबरेची, गुडघ्याची शस्त्रक्रिया अगदी मोफत करून दिली आहे. त्यांच्या या तातडीने केलेल्या मदतीसाठी अनभवणे यांनी त्यांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा