You are currently viewing स्वप्न सुखाचे

स्वप्न सुखाचे

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी श्री मुबारक उमराणी यांची काव्यरचना

हाती फुल देत माझ्या
ना तू हसलीस
ना तुझे ते फुल
Love me,Love me not
करीत एक एक पाकळी
उगीचचं तोडत राहिलीस
एफ् एम् रेडिओ सारखी
चार गाणी ब्याक टू ब्याक
करीत जाहिरात दिल्यासारखी
बडबडत राहिलीस
गाणे तीनशे पासष्टदिवस म्हणत
वायफळ बडबड तेच ते
कर्कश संगीत ऐकवत
राहिलीस
हाती दिलेले तिळगूळ
रस्ताभर सांडले
एक एक दिवस वेचल्यासारखा
मी वेचत राहिलो.
*तोंडाला मास्क,
सोशल डिस्टन्स ठेवत
हात साबणाने धुत राहिलो*
गर्द भरल्या धुक्यात
स्वप्न सुखाचे मी
शोधत राहिलो.

©मुबारक उमराणी
सांगली
९७६६०८१०९७.

प्रतिक्रिया व्यक्त करा