सिंधुदुर्ग : उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे रविवार १६ जानेवारी २०२२ रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. रविवार दि. १६ जानेवारी २०२२ रोजी सकाळी 8.00 वाजता शासकीय विश्रामगृह, रत्नागिरी येथून मोटारीने वैभववाडी, जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. सकाळी 10.30 वाजता शिवसेना शाखा वैभववाडी येथे आगमन व वाभवे- वैभववाडी नगरपंचायत प्रमुख कार्यकर्त्यासमवेत बैठक. सकाळी 11.00 वाजता वैभववाडी येथून मोटारीने कुडाळ जि. सिंधुदुर्गकडे प्रयाण. दुपारी 12.30 वाजता कुडाळ शहर येथे वैभव नाईक यांचे समवेत कुडाळ नगरपंचायत- प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक. दुपारी 2.00 वाजता राखीव. दुपारी 2.30 वाजता कुडाळ येथून मोटारीने देवगड कडे प्रयाण. दुपारी 4.00 वाजता देवगड येथे आगमन व देवगड –जामसंडे मळई नगरपंचायत प्रमुख कार्यकर्त्यांसमवेत बैठक. सायंकाळी 5.00 वाजता देवगड येथून मोटारीने रत्नागिरी कडे प्रयाण. (देवगड-पावस सागरी मार्ग).
पालकमंत्री सामंत यांचा 16 जानेवारी चा दौरा..
- Post published:जानेवारी 14, 2022
- Post category:बातम्या / राजकीय / विशेष / सिंधुदुर्ग
- Post comments:0 Comments