जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या राष्ट्रीय पुरस्कारित ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ.सुमती पवार यांची काव्यरचना
मानकरी राष्ट्रीय युवक दिवसाचा…
अनमोल हिरा विवेकानंद
आजन्म तयांना होता पहा ना ….
ज्ञानाचाच हो छंद ….
रूप देखणे बुद्धीमत्ता,ज्ञानावरती सत्ता
एकपाठी, अमोघ वाणी ….
मनी सले परवशता …..
नेता होता बालपणी ही ….
खेळातही होता प्रविणं
कमावलेलेली शरीरयष्टी
दारिद्र्य होते दारूणं…..
उपासना हे बळ मनीचे
परमहंस भेटले ….
योग्याने ह्या हिऱ्यास मग हो
पैलू पहा पाडले …
संन्यासाची दिक्षा घेतली
सुरू केली भटकंती
थेट गाठली अमेरिका नि
पटवून दिली महती …
भारतभूची खरी महानता
जगास जेव्हा कळली
कडकडाट घुमला टाळ्यांचा
तपश्चर्या ती फळली….
देश ही फिरून मग केली
पहा ज्ञानजागृती
विवेक होता मनी मानसी
देशावरती प्रीती ….
होणे नाही पुन्हा असा हो
ज्ञानवंत नि योगी
लाख लाख त्या करू वंदना
थोडे बनू हो त्यागी ….
प्रा.सौ.सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
दि : १२ जानेवारी २०२२
वेळ : संध्या : ५ :१७