You are currently viewing जाहिरनामा माहिती तरी आहे का ?

जाहिरनामा माहिती तरी आहे का ?

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

माहिती अधिकार नियोजन समिती सांगली, संस्थापक अध्यक्ष , सामाजिक कार्यकर्ते अहमद मुंडे यांचा लेख

गोरगरीब जनतेला स्वस्त आणि रास्त भावात निवडक आणि स्वच्छ शासन दरानुसार अन्न धान्य मिळावे यासाठी शासनाने रेशन दुकान ही संकल्पना अमलात आणली आहे त्यानुसार रेशनकार्ड प्रकार वर्गवारी पांढरे रेशनकार्ड. अंत्योदय रेशनकार्ड. केशरी रेशनकार्ड अशी वर्गवारी करण्यात आली आहे. आर्थिक दुर्बल निकषांवर २००५ साली सर्वे करण्यात आला होता. त्यानुसार अंत्योदय दिनदयाळ. म्हणजे दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना अल्प दरात व मोफत अन्न धान्य वितरण केले जाते. ग्रामीण भागातील ३९ हजार उत्पन्न मर्यादा. शहरातील लोकांच्या साठी ४९ हजार व पांढरे रेशनकार्ड १ लाख उत्पन्न पण असा सर्वे झालाच नाही खरे वार्यावर आणि सबल लाभार्थी
‌रेशन दुकान देण्यासाठी शासनाने काही अटी शर्ती घालून देण्यात आल्या आहेत त्यानुसार अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मधील कलम १२(१) ( इ) नुसार तयार करण्यात आलेल्या शासन निर्णय क्र रा भाव दुकानें १७१६/ पक्र दिनांक ०६/०७/२०१७ पासून रेशन दुकान देण्यासाठी वेळोवेळी जाहिरनामा काढणे अशी प्रकिया राबविण्यात येते
सार्वजनिक वितरण प्रणाली अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ मधील कलम १२(१) ( इ) नुसार दिनांक २४/०३/२०२१ रोजी रेशन दुकान वितरण संदर्भात जाहिरनामा काढण्यात आला होता त्यानुसार खालील प्रमाणे प्राधान्य क्रम देण्यात आलेला आहे पण आज हा जाहीरनामा कुठेही ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका तहसिलदार कार्यालय येथे लावण्यात आला नाही वृतमानपत्र अस कोणतंही माध्यम अवलंबले गेले नाही म्हणजे सर्व रेशन दुकान वाटप पूर्व नियोजित होत कां ?
(१) ग्रामपंचायत
(२) नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट ( दि २८ फेब्रुवारी २०२० पूर्वी नोंदणी असणारा )
(३) नोंदणीकृत सह संस्था ( २८ फेब्रुवारी २०२० पूर्वी नोंदणी असणारी )
(४) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याअंतर्गत नोंदणी संस्था ( दि २८ फेब्रुवारी २०२० पूर्वी नोंदणी असावी )
(५) महिला स्वयंसहाय्यता बचत गट किंवा महिलांच्या सहकारी संस्था यांना प्राधान्य देण्याचा निर्देश २४/३/२०२१ नुसार प्राप्त झाला आहे
‌‌. प्राधान्य क्रमानुसार गटांची निवड करताना ज्येष्ठ. वरधनक्षम व नियमित कार्यरत असलेल्या अंतर्गत येईल तसेच निवड करण्याच्या गटांचे हिशोब व लेखे अदयावत असावेत व परतफेड प्रमाण किमान ८०/ टक्के असावे तसेच प्राधान्य क्रमानुसार रास्त भाव दुकानें व किरकोळ केरोसीन परवाने मंजूर केलेल्या दुकानांचे व्यवस्थापन महिला किंवा त्यांच्या समुदायादवारे करणे आवश्यक आहे असे आश्वासन २४/३/२०२१ नुसार करण्यात आले आहे
संबंधित ग्रामपंचायत पंचायत व तत्सम स्थानिक संस्था नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट. गट नोंदणीकृत सह संस्था महाराष्ट्र सह संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था व महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था यांना कळविणे या हेतूने जाहीर करण्यात येते की वाळवा या तालुक्यातील खालील नमूद केलेल्या गावांसाठी शासननिर्णयातील मार्गदर्शक तत्वानुसार नवीन रास्त भाव दुकान परवानगीसाठी अर्ज करायचे असेल तर त्यांनी आपल्याला जाहिरनामा कळला असेल तर तहसिलदार वाळवा यांचे कार्यालयात दि २५/३/२०२१ ते २४/४/२०२१ पर्यंत कार्यालयात करावयाचे आहेत त्यासाठी ज्यांना गरज आहे यापूर्वी केले आहेत प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार करणेत येणार नाही म्हणजेच कोणतीही पूर्व सूचना नाही फक्त एक प्रोसेस म्हणून हे सर्व केलें जाते म्हणजे आपल्याला खुळयात काढल जातंय अगोदरच कुणाला रेशन दुकान द्यायचे आहे कोण आपला आहे कोण कोणत्या पक्षाचा आहे अधिकारी व कर्मचारी हे सर्व पैसे खाऊन आपल्याच व्यक्तिला रेशन दुकान मिळावे यासाठी प्रयत्न करतात
#* वाळला तालुक्यातील. खरातवाडी. गोटखिंडी. कुरळप. नरसिंहपूर. महादेववाडी. गाताडवाडी. डोंगर वाडी. देवरडे. बिचूद. ऐतवडे खुर्द. किल्ले मच्छिंद्रगड. वाटेगाव. बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर यांनी बांधकाम कामगार यांचेसाठी २०२० रोजी रेशन दुकान मागणी अर्ज केला होता त्यामुळे इस्लामपूर वगळले काय ?
रास्त भाव दुकानें मंजूर करण्यासाठी अर्जासोबत खालील प्रमाणपत्र स्वयम् साक्षांकित प्रती जोडणे आवश्यक आहे
(१) ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था
* विहित नमुन्यातील भरलेला अर्ज
* रक्कम रूपये ५ चलानाचे शासकीय खजिन्यात जमा केले बाबत चलनाची मूळ प्रत
* रास्त भाव दुकान चालविणेस तयार असलेला ग्रामपंचायत ठराव
* खेळते भांडवल उपलब्धता प्रमाणपत्र
* ग्रामपंचायत लेखापरीक्षण अहवाल मागील ५ वर्षांचा
* जिल्हा परिषद पंचायत समिती नाहरकत प्रमाणपत्र
* जागा जागेबधदल ग्रामपंचायत ८ अ. भाड्याची जागा असल्यास ८ अ सिटी सर्व्हेचा उतारा. व १०० रु स्टँप पेपरवर जागा मालक नोंदणीकृत भाडे पट्टा करार
(२) नोंदणीकृत स्वयंसहाय्यता बचत गट व महिला स्वयंसहाय्यता बचत गट व महिलांच्या सहकारी संस्था
* विहित नमुन्यातील संपूर्णपणे भरलेले अर्ज
* बचत गट अस्तित्वात असलेला कालावधी. बचत गटांच्या दि २८/२/२०२० पूर्वीच्या स्थापनेबाबत बॅंक खात्यांचे पासबुक / बचत गट स्थापनेबाबत बॅंक प्रमाणपत्र
* बचत गट सर्व सदस्यांची यादी
* गट स्थापन दिनांक नमूद असलेल्या गटाच्या ठरावाची प्रत
* रक्कम रूपये ५ चलनाचे शासकीय खजिन्यात जमा केले बाबत चलनाची मूळ प्रत
* सर्वसाधारण शैक्षणिक पात्रता. बचत गटांच्या सभासदांची शैक्षणिक पात्रता दर्शविणारे कागदपत्रे
* दारिद्र्य रेषेखालील सभासदांची संख्या. सभासद दारिद्र्य रेषेखाली असल्यास गट विकास अधिकारी नगरपालिका महानगरपालिका प्रमाणपत्र
* सवबचत. बचत गटांची आर्थिक व्यवहारांची स्थिती दर्शविणारे कागद
* खेळते भांडवल. गत ३ वर्षांचा ताळेबंद पत्रक व खेळत्या भांडवलाबाबत आवश्यक कागदपत्रे लेखा परीक्षण अहवाल
* बॅकचा सहभाग बॅंकेकडून कर्ज घेतले असल्यास त्याचे संबंधित कागदपत्रे व सदर कर्ज नियमित परतफेड असल्याबाबत पुरावा. स्वबचत खेळत भांडवल. बॅंक सहभाग. इत्यादी अनुषंगाने गट विकास अधिकारी/ ग्रामीण विकास यंत्रणा यांचें बचत गटांचे वर्गीकरण प्रमाणपत्र कर्ज घेतले नसल्यास कर्ज घेतले नसलेबाबत स्वयंसहाय्यता बचत गटांचे प्रतिज्ञापत्र
* सहकारी संस्था नोंदणीकृत असलेबाबत प्रमाणपत्र
* आर्थिक व्यवहारांचे हिशोब वा लेखे अद्यावत ठेवलेबाबत पुरावा किमान मागील पाच वर्षांतील नफा/ तोटा पत्रक/ बॅलन्स शीट इ सतयप्रती
* सभासदांना वाटप केलेल्या कर्जाच्या तपशीलाचया अनुषंगाने वसुलीबाबत सदसथिती दर्शविणारा पुरावा
* जागा. जागेबाबत कागदपत्रे
ग्रामपंचायत ८ अ सिटी सर्व्हे उतारा. भाड्याची जागा असल्यास भाडे पट्टा करार १०० रु स्टँप वर
* इतर वैशिष्ट्ये पूर्ण कामाबाबतचा अहवाल व त्याबाबतचा पुरावा राष्ट्रीय. राज्यस्तरीय. प्रादेशिक. स्तरावरील प्रदर्शनात सहभाग व इतर शासकीय योजना सहभाग बाबत संबंधित जिल्हा स्तरीय शासकीय अधिकारी यांचें प्रमाणपत्र
* आर्थिक व्यवहार हिशोब लेखे अद्यावत असणे मागील पाच वर्षांपासून
नफा तोटा पत्रक बॅलन्स
* सभासद कर्ज वाटप पत्रक माहिती
* यापूर्वी रेशन दुकान मंजूर झाले आहे का.? असल्यास प्रस्तुत सदसथिती काय आहे ?
* बचत गटांच्या नावे किरकोळ केरोसीन / सेल घाऊक/ अरधघाऊक/ रास्त भाव दुकान नसलेबाबत प्रमाणपत्र
(३) सहकारी संस्था
* संस्थेचा ठराव
* संस्था चालक शैक्षणिक पात्रता
* खेळते भांडवल उपलब्धता प्रमाणपत्र
* संस्थेचे लेखापरीक्षण मागील पाच वर्ष
* जिल्हा उपनिबंधक/ सहहयक निबंधक याचा नाहरकत दाखला
* संस्थेचे नोंदणी प्रमाणपत्र
* संबंधित संस्थेचे कार्यक्षेत्र सदर गावाचा समावेश आहे का
* संबंधित संस्था जागा सवताची आहे का. भाड्याची असल्यास भाडेपटटकरार १०० रुपये स्टॅम्प वर
*# जिल्हा माहिती अधिकारी सांगली *# यांच्या आदेशानुसार हा जाहीरनामा वृतमानपत्रात प्रसिद्ध करणे बंधनकारक आहे
*# तहसिलदार वाळवा *# सदर जाहिरनामा आपल्या कार्यालयात नोटीस बोर्डवर. ग्रामपंचायत नोटीस बोर्डवर. पंचायत समिती नोटीस बोर्डवर. लावून यासाठी व्यापक प्रसिद्धी करण्याचे आदेश देण्यात आले होते संबंधित विभागातील पुरवठा विभाग यांनी यासाठी पुढाकार घेणे आवश्यक आहे यासाठी सर्व पुरवठा दक्षता समिती यांना एक एक जाहिरनामा प्रत देणे बंधनकारक आहे अर्जाची मागणी करणार्या ग्रामपंचायत व तत्सम व स्थानिक स्वराज्य संस्था नोंदणीकृत सहकारी संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम किंवा संस्था नोंदणी अधिनियम या कायद्याच्या अंतर्गत नोंदणी झालेल्या संस्था व महिलांच्या सहकारी संस्था यासंसथाना अर्जाचा नमुना देणें बंधनकारक होते
सदरचा जाहिरनामा शासननिर्णय क्र रा भा दु. १७१६ प्र क्र २३९ नापु ३२ दिनांक ६ जुलै २०१७ मध्ये दिलेल्या अटि व शर्ती अधीन राहून काढण्यात येत आहे. ग्रामपंचायत व तत्सम स्थानिक स्वराज्य संस्था यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल वरिल सर्व निकषचा विचार करून रास्त भाव दुकानांची गुणानुक्रमे निवड करणेत येईल समितीने निवड केल्यानंतर महिला ग्रामसभेकडे वाचारारथ व शिफारशी साठी पाठविणेत येईल ग्रामसभेची शिफारस घेऊन रास्त भाव दुकान मंजुरी बाबत अंतिम निर्णय घेणेत येईल
असा आदेश
*# जिल्हा पुरवठा अधिकारी सांगली
*# जिल्हा पुरवठा अधिकारी वाळवा
समाजसेवा बंद आंदोलन मोर्चा उपोषण रस्ता रोको आंदोलन निवेदन तक्रार अर्ज मागणी अर्ज प्रचार प्रसार प्रसिध्दी जाहिरात वाचन लेखन संबोधन प्रबोधन आणि मग नेतृत्व करण्यासाठी
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रुग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

प्रतिक्रिया व्यक्त करा