You are currently viewing सावंतवाडीत शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन….

सावंतवाडीत शहरात व तालुक्यात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन….

सिंधुदुर्गनगरी :

सावंतवाडी तालुक्यातील मौजे- सावंतवाडी खासकीलवाडा वार्ड-ई पोलिस वसाहतमधील रुम नं. 15 चा परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मौजे- बांदा हॉस्पीटलकट्टा येथील घर क्र. 441 चा 5 मीटर परिसर, मौजे सावंतवाडी खासकीलवाडा येथील वार्ड-ई मधील सदनिका संचयनी पार्क दुसरामजला क्र. 350/12 चा परिसर, खासकीलवाडा येथील घर क्र. 211-डी पहिल्यामजल्याचा आजूबाजूचा 70 चौ.मी. परिसर, मौजे सावंतवाडी सलाईवाडा येथील घर क्र. एफ-82 आजूबाजूचा 77 चौ.मी. परिसर या क्षेत्रामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मौजे- नेमळे पेंडुरकरवाडी येथील घर क्र. 834 चा 50 मीटर परिसर, मौजे वेत्ये गावकरवाडी येथील घर क्र. 427 चा 20 मीटर परिसर व गावडेवाडी येथील घर क्र. 220 चा 20 मीटर परिसर, मौजे बांदा देऊळवाडी येथील घर क्र. 875 चा 5 मीटर परिसर, मौजे सावंतवाडी सबणीसवाडा  वार्ड-डी  येथील  घर क्र. 113 चा चारीबाजूचा 25 मीटर परिसर,  मौजे सावंतवाडी भटवाडी येथील वार्ड-सी बर्जिसवाडा रोड पासून 40 मीटर नवीन इमारतीचा 30 चौ.मी. चा परिसर व मौजे सावंतवाडी सलाईवाडा येथील घर क्र. एफ-166-अ चा परिसर, घर क्र. एफ-165 चा परिसर, घर क्र. एफ-166 चा परिसर या क्षेत्रामध्ये कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

सावंतवाडी तालुक्यातील मौजे- मळगाव लातयेवाडी येथील घर क्र. 1057 चा 20 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे.

सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक 7 ऑक्टोबर 2020 रोजी रात्री 12.00 पर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, वस्तुविक्री बंद राहणार आहेत. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे- जाणे व सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही. तसेच सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 व 58 अन्वये तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनयम, 1951 चे कलम 71,139 तसेच भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860)  च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल, असे आदेश सावंतवाडी उपविभागीय अधिकारी सुशांत खांडेकर  यांनी दिले आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा