केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे मार्गदर्शन करणार
कणकवली
सिंधुदुर्ग भाजपा जिल्हा कार्यकारिणी बैठक बुधवार 12 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजता महिला भवन ओसरगाव कणकवली येथे संपन्न होत आहे.या बैठकीला भाजपा नेते तथा केंद्रीय मंत्री ना.नारायणराव राणे व मान्यवर नेते मंडळी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
या बैठकीला सर्व जिल्हा पदाधिकारी, जिल्हा कार्यकारिणी सदस्य,सर्व मोर्चा/आघाडी जिल्हाअध्यक्ष,जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष,विषय समिती सभापती, जिल्हा परिषद सदस्य , पंचायत समिती सभापती,उपसभापती, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष,मंडल अध्यक्ष, मंडल सरचिटणीस अपेक्षित आहेत.तरी सर्व अपेक्षित पदाधिकारी, यांनी वेळेत बैठक स्थळी उपस्थित रहावे,असे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी केले आहे.