You are currently viewing ओटवणे मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद

ओटवणे मंडळाचे उपक्रम कौतुकास्पद

ओटवणे

ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळाचे शैक्षणिक सामाजिक व कला क्रीडा क्षेत्रातील उपक्रम कौतुकास्पद असून मंडळाच्या अशा विधायक उपक्रमातून गावाच्या विकासाला चालना मिळते. त्यामुळे मंडळाच्या या कार्याचा ग्रामीण भागातील मंडळांनी आदर्श घ्यावा असे आवाहन समाजसेवक डॉ चंद्रकांत सावंत सर यांनी केले.
ओटवणे गावठणवाडी कला क्रीडा व मित्र मंडळाच्या ९ व्या गांव चव्हाटा महोत्सवाच्या उद्द्घाटन प्रसंगी डॉ चंद्रकांत सावंत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर संजय गांधी निराधार योजनेचे सावंतवाडी अध्यक्ष अशोक दळवी, सरपंच उत्कर्षा गावकर, देवस्थान कमिटी अध्यक्ष रवींद्र गावकर, माजी सरपंच आत्माराम गावकर, माजी उपसरपंच बाबाजी गावकर. वाफोली माजी उपसरपंच मंथन गवस, सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लबचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ पत्रकार सिताराम गावडे, व्यसनमुक्ती केंद्राचे गुरु कोटकर, ग्राम पंचायत सदस्य रत्नमाला गावकर, माजगावचे संजय माजगावकर, तिलारी पाटबंधारे खात्याचे उप अभियंता संतोष कविटकर, हरीहर मयेकर, एकनाथ गावकर, तलाठी डी पी पास्ते, संजय कविटकर, विश्वनाथ भिसे, मंगेश चिले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी अशोक दळवी यांनी मंडळाच्या एकजूटीचे कौतुक करीत युवकांची ही एकजूटच मंडळाला निश्चित ध्येयाकडे देणारी असल्याचे सांगितले. सिताराम गावडे यांनी या मंडळाबाबत आदर्शवत मंडळ असे गौरवोद्गार काढून या मंडळाचा उद्देश आणि ध्येय गावाला सर्वांगीण विकासाकडे नेणारे असून त्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. यावेळी डॉ चंद्रकांत सावंत यांनी आपल्या सन्मानाची शाल व श्रीफळ प्रसिद्ध दशावतारी कलाकार विठ्ठल गावकर यांना प्रदान केली.
या कार्यक्रमात शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, प्रशासन, राजकीय व पत्रकारिता या क्षेत्रात योगदान दिलेल्या डॉ चंद्रकांत सावंत, गुरु कोटकर, संतोष कविटकर, सिताराम गावडे, अशोक दळवी, हरिहर मयेकर, देवेंद्र नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. दरम्यान सावंतवाडी पंचायत समितीचे माजी उपसभापती विनायक दळवी यांनी यावेळी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. तसेच मंडळाच्या विधायक उपक्रमासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन मंडळाचे सचिव महेश चव्हाण तर आभार मंडळाचे अध्यक्ष उमेश गावकर यांनी मानले. यावेळी मंडळाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा