प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाल्याशिवाय माघार नाही; संबंधित प्रशासनाला दिला इशारा..
सावंतवाडी
कुणकेरी रस्त्यासाठी आज तिसऱ्यांदा ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान जोपर्यंत आता कामाला प्रत्यक्ष सुरुवात होत नाही, तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. येथील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर हे आंदोलन सुरू आहे.
यावेळी जिल्हा बँक संचालक महेश सारंग, माजी सभापती प्रमोद सावंत, कुणकेरी सरपंच विश्राम सावंत, कृष्णकांत सावंत, विनोद सावंत, सूर्यकांत सावंत, लक्ष्मण सावंत, मंगेश सावंत, राजन गावडे, माजी नगरसेवक आनंद नेवगी, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख रूपेश राऊळ,भाजपा शहराध्यक्ष अजय गोंदावळे, बंटी पुरोहित, अजय सावंत,अमित परब,योगेश चव्हाण, अमीर नाईक, कृष्णा मेस्त्री, गिरीधर बांदेकर, सुरेश सावंत,उमेश परब, महादेव सावंत, शिवदत्त घोगळे,जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा, साहिल सावंत,मनोज घाटकर, नागेश सावंत, हनुमंत राणे, जालिंदर परब,सुनील देसाई, मधुकर देसाई, प्रवीण देसाई, प्रमोद गावडे, अमोल भाईप आदी उपस्थित होते.