सावंतवाडी
आरोंदा येथील युवकाने गळफास घेत आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आला. वसंत बाबुराव मोटे ( ३७, रा. मानसीवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याचा भाऊ जगन्नाथ बाबुराव मोटे यांनी याबाबत माहिती पोलिसांना दिली त्यानुसार येथील पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
दरम्यान, नैराश्यातून त्यांनी आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी उघडकीस आले आहे. रविवारी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घरच्याच बाजूला असलेल्या झाडाच्या फांदीला गळफास घेतलेल्या स्थितीत त्यांच्या भावाला वसंत हे दिसून आले. त्यांनी नायलॉन दोरीच्या सहऱ्याने गळफास घेतला. याबाबतची खबर भाऊ जगन्नाथ बाबुराव मोटे यांनी येथील पोलीस ठाण्यात दिली त्यानुसार सहाय्यक पोलिस निरीक्षक जयराम पाटील, पोलीस हेड कॉन्स्टेबल व्ही व्ही केरकर, जी वि मावळे यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला.
वसंत मोटे हे पुणे येथे एका हॉटेल मध्ये कामानिमित्त होते त्यानंतर कोरोनाकाळात ते काम सुटले व त्यानंतर त्यांनी कर्जत येथ देखील हॉटेल मध्ये काम केले यानंतर गेल्या महिन्या पासून ते गावीच होते त्यांनी नैराश्यातून आत्महत्या केल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.