You are currently viewing कणकवलीत रॅपिड टेस्टमध्ये दोघे पॉझिटिव्ह

कणकवलीत रॅपिड टेस्टमध्ये दोघे पॉझिटिव्ह

कणकवली

कणकवली पटवर्धन चौकात सुरू असलेल्या कोरोना तपासणीमध्ये दोन जण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मिळाले आहेत. त्यामुळे आता शहरात सतर्कता बांधण्याची गरज निर्माण झाली आहे. कणकवली शहरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी नगरपंचायतने पुढाकार घेत आरोग्य विभाग यांच्या मदतीने पटवर्धन चौक इथं कोरोना तपासणी पथक ७ जानेवारी पासून तैनाथ करण्यात आले आहे. त्यामध्ये रॅपिड व आरटीपीसीआर तपासणी करण्यात येते आहे.

आज आरोग्य कर्मचारी नीलम कांबळे, नगरपंचायत कर्मचारी सतीश कांबळे, विनोद सावंत रमेश कदम व पोलीस कर्मचारी उपस्थित होते. आज सकाळ पासून दुपारपर्यंत ५२ रॅपिड टेस्ट करण्यात आल्या. यामध्ये दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये एक जण शहरात राहणारा आहे व दुसरा मुंबईवरून गावी दाखल झालेला असल्याने कणकवली शहरात खळबळ उडाली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा