सिंधुदुर्गनगरी
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत हे उद्या रविवार दि. 9 जानेवारी व सोमवार दि. 10 जानेवारी 2022 रोजी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि. 9 जानेवारी 2022 रोजी सायं. 6 वा. जिल्हाधिकारी कार्यालय, सिंधुदुर्ग येथे आगमन व जिल्हा नियोजन समिती पूर्वतयारी बैठक. सायं. 7 वा. ओरोस – सिंधुदुर्ग येथे राखीव.
सोमवार दि. 10 जानेवारी 2022 रोजी सकाळी 11 वा. जिल्हा नियोजन समितीच्या नवीन सभागृहात जिल्हा नियोजन समिती सभा, दुपारी 1 वा. जिल्ह्यातील रस्त्यांच्या विकासकामांबाबत आढावा बैठक, दुपारी 1.30 वा. जिल्हा परिषदेकडून निःसमर्थ व्यक्तींसाठी राखीव 5 टक्के निधीचे नियंत्रण करणेकरिता गठित जिल्हास्तरीय समितीची सभा, दुपारी 1.45 वा. राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य अभियान समितीची बैठक, दुपारी 2 वा. ओरोस – सिंधुदुर्ग येथून मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.