You are currently viewing कणकवलीतील जुगार अड्डयांना मिळाला नवा चेहरा

कणकवलीतील जुगार अड्डयांना मिळाला नवा चेहरा

आज रात्री ११.३० ला बसणार डॅडीचा अंदरबाहर पट

सिंधुदुर्ग जिल्ह्यात तरुणांच्या हाताला काम मिळणारे उद्योग व्यवसाय ना कोणी राजकारणी आणत ना व्यावसायिक ना उद्योगपती. परंतु दारू, जुगार, मटका सारखे अवैध व्यवसाय जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. दात पडक्या आप्पा, मोंतेरो, पारावरचा विठ्ठल असे एक ना अनेक जुगाराचे बादशाह जिल्ह्यात कमी म्हणून कणकवलीत डॅडी म्हणून ओळख असणारे वाईट आडनावाचा एक जुगारी आपल्या मुलाला सोबतीला घेऊन अंदरबाहर हा जुगार चालवतात.
वाईट आडनावाच्या डॅडी च्या जुगाराच्या अड्डयांवर कणकवली परिसरातील राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी, पदाधिकारी जुगार खेळण्यासाठी हजेरी लावतात. याच राजकीय लोकांमधून काही जणांची जुगारात तक्षीम असते. राजकीय लोकांचा वावर असला की खाकी वर्दीची नजर अशा जुगाराच्या अड्डयांवर पडत नाही, आणि याचाच फायदा घेत डॅडी आणि त्याचा पोरगा बिनधास्तपणे जुगाराचा अड्डा चालवतात. डॅडी च्या जुगाराच्या अड्डयांवर जुगाऱ्यांसाठी जेवण आणि दारू मोफत असते. त्यामुळे जिल्हाभरातून कितीतरी जुगारी अड्डयांवर हजेरी लावतात.
पोलिसांची धाड पडू नये याची खबरदारी घेताना डॅडी आपला जुगाराचा अड्डा जागा बदलून बैठका बसवतो. आज रात्री कणकवलीत होणारी जुगाराची बैठक ही रात्रीच्या ठीक ११.३० वाजता सुरू होणार आहे. जिल्ह्यातील युवकांना देशोधडीला लावणाऱ्या जुगाराच्या अड्ड्यांना खकितील काही घरभेदीचे संरक्षण असल्याने अगदी बिनधास्तपणे जुगाराचे अड्डे चालवले जातात. जिल्ह्यात सुरू असणाऱ्या जुगारांवर जिल्ह्याचे पोलीस प्रमुख काय कारवाई करतात हेच पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

प्रतिक्रिया व्यक्त करा