You are currently viewing केंद्रशाळा शेर्पेचे ३ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

केंद्रशाळा शेर्पेचे ३ विद्यार्थी शिष्यवृत्ती गुणवत्ता यादीत

-महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत सन 2021 मध्ये इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात आली.सदर शिष्यवृत्ती परीक्षेत केंद्रशाळा शेर्पे चे 4 विद्यार्थी परीक्षेस बसले होते .त्यातील 3 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले आहेत .एकाच वेळी केंद्रशाळा शेर्पेचे 3 विद्यार्थी गुणवत्ता यादीत येणे हा शेर्पे सारख्या ग्रामीण भागातील शाळेचे शैक्षणिक यश शंभर नंबरी आहे.शिष्यवृत्ती परीक्षेतील विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही प्रकारचे शिकवणी वर्ग नसताना फक्त शाळेत घेतलेल्या शिकवणी वरच व विद्यार्थी व पालकांनी दिलेल्या योगदानाचा वरच हा मानाचा व यशाचा मुकुट केंद्रशाळा शेर्पेला मिळालेला आहे .अथर्व सत्यविजय सावंत राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात 6वा ,सिद्धी संजय गर्जे – ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात 57 वी ,चिन्मय दशरथ शिंगारे -ग्रामीण सर्वसाधारण शिष्यवृत्ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात 67 वा या प्रमाणे विद्यार्थी सिंधुदुर्ग जिल्हा गुणवत्ता यादीत आलेले आहेत . या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन अमोल भंडारी , दशरथ शिंगारे ,राजू गर्जे यांनी केले . सलग दोन वर्ष केंद्रशाळा शेर्पे चे विद्यार्थी गुणवत्ता यादीत येत आहेत आणि हा यशाचा क्रम चढता आहे गेल्या वर्षी 1 विद्यार्थी गुणवत्ता यादीत यावर्षी 3 विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत आले आहेत .ही शैक्षणिक गुणवत्ता वाढीची कामगिरी शेर्पे सारख्या ग्रामीण भागातील शाळेत झाली हे कौतुकास्पद आहे .स्पर्धा परीक्षेची आवड विद्यार्थ्यांच्या मनात रुजविण्यासाठी शेर्पे शाळेचे शिक्षक घेत असलेल्या कष्टाचे चीज होत असल्याचे दिसून येत आहे . केंद्रशाळा शेर्पेच्या शैक्षणिक उपक्रमांना नेहमी प्रोत्साहन देण्याचे काम ग्रामपंचायत शेर्पे, शाळा व्यवस्थापन समिती केंद्रशाळा शेर्पे व शेर्पे गावातील सर्व पालक यांच्या माध्यमातून सातत्याने होत असते .केंद्रशाळा शेर्पे च्या या यशाबद्दल सर्व गुणवंत विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक व पालक यांचे अभिनंदन शेर्पे गावचे सरपंच निशा गुरव , उपसरपंच – अरुण बम्हदंडे ,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष -विलास पांचाळ उपाध्यक्ष – संपदा राऊत गटशिक्षणाधिकारी कणकवली- किशोर गवस, शिक्षण विस्तार अधिकारी प्रभाग तळेरे – सुहास पाताडे ,केंद्रप्रमुख सद्गुरु कुबल व शाळेचे मुख्याध्यापक दशरथ शिंगारे यांनी केले .केंद्रशाळा शेर्पे च्या या यशाबद्दल सर्व विद्यार्थी , शिक्षक , पालक यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा