You are currently viewing देखणा दिवा

देखणा दिवा

जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य कवी सचिन मस्कर यांची काव्यरचना

सौंदर्याचा धूर काढत
रोज रुबाब करते नवा
अहंकारात जळणारा
असतो ” देखणा दिवा “..

लग्नाअगोदर असतो
दरवर्षी बॉयफ्रेंड नवा
चांगले स्थळ मागणारा
असतो ” देखणा दिवा “..

जोडीदाराबद्दल म्हणते
“स्वभावाला तेल लावा”
लग्नात रूप पाहणारा
असतो ” देखणा दिवा “..

फसगत झाल्यावर म्हणते
“आईबाबा, मला वाचवा”
प्रेमाचा कचरा करणारा
असतो ” देखणा दिवा “..

©️®️ सचिन मस्कर , नवी मुंबई

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 × 2 =