कणकवली पटवर्धन चौकात कोरोना तपासणीस सुरवात
मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी घेतला आढावा
कणकवली
कणकवली पटवर्धन चौकात कोरोनाच्या आरटीपीसीआर व रॅपीड तपासणीसाठी सुरुवात करण्यात आली असून कणकवली शहरात कोरोना संसर्ग वाढू नये व विनाकारण फिरणाऱ्यांना चाप बसावा यासाठी प्रशासनाने पुन्हा कणकवली पटवर्धन चौक येथे कोरोना तपासणीला सुरुवात केली आहे.
कोरोना तपासणी ठिकाणी कणकवली मुख्याधिकारी अवधुत तावडे यांनी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी ज्यांना ज्यांना लक्षणे आढळतील त्यांची कोरोना तपासणी करण्याच्या सूचनाही केल्या.यामध्ये प्रामुख्याने भाजीविक्रेते,फळविक्रेते, व्यापारी व लक्षणे असणाऱ्या नागरिकांच्या तपासण्या करण्याच्या सूचना यावेळी मुख्याधिकारी अवधूत तावडे यांनी दिल्या यावेळी आरोग्य कर्मचारी निलम कांबळे ,नगरपंचायत कर्मचारी सतीश कांबळे, विनोद सावंत ,रमेश कदम व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.