You are currently viewing कुणकेश्वर किनारी बाळशास्त्री जांभेकर यांचे रेखाटले वाळूशिल्प

कुणकेश्वर किनारी बाळशास्त्री जांभेकर यांचे रेखाटले वाळूशिल्प

चित्रकार अक्षय मेस्त्री यांची जन्मदिनी अनोखी आदरांजली

देवगड

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक,दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावरती युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याने भव्य वाळूशिल्प उभारुन पत्रकार दिनी अनोखी मानवंदना दिली.

देवगड तालुक्यातील गवाणे येथील युवा चित्रकार अक्षय मेस्त्री नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण कलाकृती सादर करीत असतो आणि त्याचबरोबर समाजाला सामाजिक संदेश देण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक,दर्पणकार तथा आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी सुरू केलेल्या “दर्पण”वृत्तपत्राचा दिवस ६ जानेवारी हा पत्रकार दिन म्हणून देशभरात सर्वत्र साजरा केला जातो.६ जानेवारी या पत्रकार दिनाचे औचित्य साधून अक्षय मेस्त्री याने कुणकेश्वर येथील समुद्र किनाऱ्यावरती आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे २० फुट बाय १२ फुट लांबीचे वाळूशिल्प साकारले आहे.

पत्रकार दिना दिवशी आद्यपत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे कुणकेश्वर समुद्र किनाऱ्यावरती भव्य वाळूशिल्प साकारल्या बद्दल तळेरे पंचक्रोशी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय मारकड,उपाध्यक्ष उदय दुदवडकर,सचिव संजय खानविलकर तसेच सर्व सदस्यांनी युवा चित्रकार अक्षय मेस्त्री याचे विशेष कौतुक केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा