आमदार नाईक यांनी वेधले प्रांतांचे लक्ष
मालवण
गाबीत समाजाच्या दाखल्यांच्या समस्येबाबत आमदार वैभव नाईक यांनी प्रांत वंदना खरमाळे यांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार उद्या ७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात महत्वाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
मालवण दौऱ्यावर आलेल्या आमदार वैभव नाईक यांचे तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी गाबीत समाजातील बांधवांना दाखला मिळविताना काही समस्या भेडसावत असल्याचे निदर्शनास आणून दिले. या पार्श्वभूमीवर आमदार नाईक यांनी प्रांत वंदना खरमाळे यांचे लक्ष वेधत आवश्यक ती कार्यवाही करावी असे सांगितले. त्यानुसार कागदपत्रांची पाहणी करून आवश्यक कार्यवाही करू असे प्रांत खरमाळे यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात उद्या सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयात बैठक होणार आहे. गाबीत समाजातील बांधवांनी हरी खोबरेकर मोबा. ९४०४१६५२०९, ९९७००८४१९९ येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.