प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांना 5 हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळण्यासाठी 10दिवसात अर्ज करण्याचे अवाहन
सिंधुदुर्गनगरी
कोविड-19 पार्श्वभुमिवर प्रयोगात्मक कलेवर अवलंबून असलेल्या कलाकारांना शासनातर्फे 5हजार रुपये इतके एकरकमी एकदाच अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. हे अर्थसहाय्य मिळण्यासाठी कलाकारांनी 10 दिवसांच्या आत संबंधित तहसिलदार यांच्याकडे अर्ज करणे गरजेचे आहे.
अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे खालील प्रमाणे आहेत.
विहीत नमुन्यातील अर्ज, महाराष्ट्रात 15 वर्षे वास्तव्याचा रहिवासी दाखला ( स्थानिक स्वराज्य संस्थेचाही दाखला ग्राहय). तहसिलदारांकडून प्राप्त उत्पनाचा दाखला. कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत असल्याबाबतचे पुरावे. आधारकार्ड, बँक खाते तपशील. शिधा पत्रिका सत्यप्रत.
पात्रता व निकष व अटी
महराष्ट्र राज्यातील संघटीत व असंघटीत क्षेत्रातील पुर्णवेळ कलेवर गुजरान असणारे कलाकार उदा. तमाशा, खडीगमंत, वासुदेव, पोतराज, चित्रकथी, बहुरुपी, कीतर्नकार, प्रबोधनकार, वारकरी संप्रदायातील तसेच स्थानिक ठिकाणी आढळणाऱ्या प्रयोगात्मक कलाप्रकारातील केवळ कलेवर अदरनिर्वाह असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलाकार. महाराष्ट्रात 15 वर्षे वास्त्व. कलेच्या क्षेत्रात 15 वर्षे कार्यरत. वार्षिक उत्पन्न 48,000/- च्या कमाल मर्यादेत. केंद्रशासनाच्या व राज्य शासनाच्या वृध्द कलाकार मानधन योजनेतून मानधन घेणाऱ्या लाभार्थी कलाकरांना तसेच वैयक्तिक शासकीय अर्थसहायाच्या आर्थीक योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहणार नाही. वर्तमान पत्रात जाहीरात प्रसिध्द झाल्यानंतर दहा(10) दिवसात अर्ज करावा.अर्ज कोणाकडे करावा, वैयक्तिक कलाकारांनी संबंधित तालुक्याच्या तहसिलदार मार्फत अर्ज सादर करावा.
अर्ज सादर करण्याची प्रक्रिया संपुर्णपणे विनामुल्य असुन अर्जदाराला अर्जासोबत कोणत्याही प्रकारचे शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. अर्ज भरुन घेण्यासाठी शासनाने कोणत्याही खाजगी व्यक्ती, संस्था संघटना यांची नेमणूक केलेली नाही. अधिक माहितीसाठी https//www.mahasanskruti.org या संकेत स्थळाला भेट द्यावी.
जिल्ह्यातील प्रयोगात्मक कलाप्रकारातील केवळ कलेवर उदरनिर्वाह असणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कलाकार यांनी या योजनेचा लाभ घ्याव असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.