रस्त्याच्या पाहणी दरम्यान मनसेची सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्त ताकीद..
सामान्य जनतेच्या सहन शिलतेचा अंत बघू नका…. मनसे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे…
कुडाळ :
पणदूर घोडगेे राज्य महामार्गावर मागील पाच वर्षांत कोट्यावधी रुपये खर्च होऊन सुद्धा आजमितीस अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे.आलिशान गाड्यांनी फिरणाऱ्या लोकप्रतिनिधी,अधिकारी व कंत्राटदारांना सामान्य जनतेच्या भावना कळणार नाहीत. रस्त्याच्या या बकाल परिस्थितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भ्रष्ट व बेजबाबदार कारभाराविरोधात निषेध दर्शवण्यासाठी कुडाळ मनसेने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन पुकारून जनतेच्या भावना प्रशासनासमोर व्यक्त केल्या होत्या.या आंदोलनात शुक्रवारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांनी रस्त्याची पाहणी करून योग्य कार्यवाही करण्याचे सांगितले.त्यानुसार शुक्रवारी दि.25 सप्टेंबर 2020 रोजी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता श्री हेेवाळे, शाखा अभियंता श्री पवार व आरेखक श्री चौरे आदी कर्मचाऱ्यांनी पणदूरतिठा ते घोडगे बाजार पर्यंत रस्त्याची पाहणी केली.यावेळी रस्त्याची अवस्था पाहता तात्काळ खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात यावे तसेच पावसाळ्यानंतर पुढील सुधारणा व डांबरीकरण काम करण्यापूर्वी संपूर्ण रस्त्याची गटार ड्रेनेज व्यवस्था सुधारणा करावी तद्नंतरच डांबरीकरण कार्पेटचे काम हाती घ्यावे,रस्त्याची साईडपट्टी आणि रस्त्याची लेवल याचा समतोल राखून सुधारणा काम करावे जेणेकरून मार्गावर पाणी न वाचता गटाराद्वारे पाण्याचा योग्य प्रकारे निचरा होईल व डांबरी करणांस कोणतीही बाधा पोहचणार नाही अशा प्रकारच्या सूचना मनसेच्या वतीने देण्यात आल्या.येत्या आठ दिवसांत परिस्थिती न सुधारल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही मनसेने दिला.