जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखिका कवयित्री डॉ.निलांबरी गानू यांची अप्रतिम काव्यरचना
आज करूया स्वप्नांचे आपल्या वास्तव सारें
जगण्याला अर्थ अन् प्रगतीचे वादळवारे. ( धृ)
चंद्रसूर्य ज्याची करीती आरती
सागर-सरिता पायाशी रमती
भारत भू शूरविरांची धरती
रक्षणार्थ माय भूमी करू पराक्रम न्यारे. / १/
तिरंगा देतसे निर्भयता मनी
तीन सागरांची गाज ही रंगांनी
स्वामीजींच्या खडकापाशी दाऊनी
मुक्त प्रकाशाचे पर्व कन्याकुमारीचे सारे /२/
साकळे प्राण लावी दिवा पाण्यात
ओघळे धार माळी नभ डोळ्यात
अस्तित्व वितळले देश प्रेमात
स्वातंत्र्य वीराचे झाले सागराशी द्वंद्व प्यारे / ३/
उंच शिखरांची रांग ऐसपैस
शुभ्र बर्फाच्या किनारी तेज रास
क्रांतिवीरांची सय ये पापणीस
पूजनास या एकजुटीने आरतीस यारे /४/
नीलांबरी गानू
राजगुरुनगर पुणे
७७४१८९४४२१