You are currently viewing वाघेरी दुग्ध विकास संस्थेवर भाजपप्रणित पॅनलची बिनविरोध निवड

वाघेरी दुग्ध विकास संस्थेवर भाजपप्रणित पॅनलची बिनविरोध निवड

11 पैकी 8 जागांवर भाजप प्रणित पॅनलचे सदस्य बिनविरोध

कणकवली

कणकवली तालुक्यातील वाघेरी येथील श्री पावणादेवी दुग्ध विकास संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भाजपा प्रणीत सहकार पॅनल चे अकरापैकी आठ सदस्य बिनविरोध निवडून आले आहेत. तर उर्वरित तीन जागा या रिक्त राहिल्या आहेत. संस्थेचे नवं नियुक्त संचालक तथा वाघेरी गावचे सरपंच संतोष राणे यांनी संस्थेचे मतदार, ग्रामस्थ व भाजपा कार्यकर्त्यांचे बिनविरोध निवडीबद्दल आभार व्यक्त केले आहेत. वाघेरी पावणादेवी दुग्ध विकास संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यात 11 सदस्यांकरिता संचालक मंडळाची नियुक्ती करायची होती.भटक्या विमुक्त जाती ची एक तर सर्वसाधारण प्रवर्गातील एक व महिला प्रवर्गातील जागा रिक्त राहिली. भाजपाप्रणीत सहकार पॅनलचे आठही उमेदवार बिनविरोध निवडून आले. यात सर्वसाधारण प्रवर्गात 6 पैकी 5, आणि महिला राखीव साठी 2 जागा पैकी 1, ओबीसी 1, मागासवर्गीय 1 अश्या एकूण आठ जणांची बिनविरोध निवड झाली. या नवनियुक्त संचालकांमध्ये संतोष राणे, राजेंद्र राणे, विजय राऊत, मारुती देवगडकर, महेश पाटील, सुखदा राणे, रुपेश गुरव, मोहन वाघेरकर यांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा