You are currently viewing सावंतवाडीत आजपासून मटका पुन्हा सुरू…

सावंतवाडीत आजपासून मटका पुन्हा सुरू…

मटकेवाल्यांमधील आपापसातील वाटाघाटीनंतर मटक्याचे राजकारण थंड…

सावंतवाडीत गेल्या काही दिवसांपासून अवैद्य धंदे, दारू, मटका यावर जोरदार खडाजंगी सावंतवाडीच्या प्रथम नागरिकांकडून केली गेली. जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दिक्षितकुमार गेडाम यांच्यावरही चिखलफेक झाली, त्यांना दारूच्या बाटल्या कुरियराने पाठविण्याच्या घोषणाही दिल्या गेल्या. पोलीस अधीक्षकांच्या सुचनेने किरकोळ मटका घेणाऱ्या दुकानदारांवर कारवाई झाली, लाखोंचा हफ्ता परंतु कारवाईत काही हजार रुपयांची रोकड सरकारी तिजोरीत जमा झाली. गेडाम साहेबांनी कारवाई सुरू करून चार दिवस होतात न होता त्यांची बदली सांगली येथे झाली आणि मटका, दारू सारख्या अवैद्य धंद्यांच्या नावाची ओरड नगराध्यक्षांकडून बंद करण्यात आली. मग जी चार दिवस ओरड करण्यात आली होती ती नक्की कशासाठी? सावंतवाडीतील लोकांच्या नजरेत श्रेष्ठ ठरण्यासाठी की आपल्या कुणा स्वकीयांच्या हितासाठी?
सावंतवाडीत आजपासून मटका पुन्हा जोरदार सुरू झाला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवे जिल्हा पोलिस अधीक्षक आपला पदभार न स्विकारतात रजेवर गेल्याने जिल्हा पोलिस अधिक्षकांचा पदभार प्रभारी असून प्रभारी अधीक्षकांच्या वरदहस्ताखाली आजपासून मटक्याला पुन्हा नव्याने उभारी मिळाली.
सावंतवाडीत अवैद्य धंदे बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना कुरियर करणारे आता मटका पुन्हा सुरू झाल्यावर गप्प का? मटक्याचा हफ्ता यापूर्वी पोलीस आणि काही पत्रकारांना मिळत असल्याची माहिती पूढे येत असतानाच आता विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांनाही हफ्ता सुरू केल्याचे बोलले जात आहे. मटकेवाल्या काहिजणांकडून तर अशीही माहिती पुढे येत आहे की, मटक्याच्या धंद्यात काही राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची नवीन मटका कंपनी पाय रोवायला पाहत होती, तिला जुन्या मटकावाल्यांकडून विरोध झाल्याने सावंतवाडीत सुरू असलेल्या मटक्यांवर कारवाई करायला भाग पाडले गेले व आता नव्या कंपनीला मटक्याच्या दुनियेत प्रवेश दिल्याने मटक्याविरुद्ध असलेला विरोध मावळला आहे. आणि पुन्हा एकदा मटकाकींग उत्स्फूर्तपणे कामाला लागले आहेत.
एकंदरीत मटक्याच्या, दारूच्या धंद्यांना चार दिवस झालेला विरोध, सावंतवाडीकरांना दाखविलेला कळवळा किती खरा किती खोटा याची प्रचिती काहीच दिवसात यायला लागली आहे. निद्रिस्त असलेला सावंतवाडीकर मात्र रोजरोजच्या नवनवीन राजकारणांपासून नवनवे डावपेच शिकत असल्याचे दिसून येत असून भविष्यातील राजकीय सारीपटावरची खेळी काय असेल हे मात्र पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.पदभार प्रभारी असून प्रभारी अधीक्षकांच्या वरदहस्ताखाली आजपासून मटक्याला पुन्हा नव्याने उभारी मिळाली.
सावंतवाडीत अवैद्य धंदे बंद करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना कुरियर करणारे आता मटका पुन्हा सुरू झाल्यावर गप्प का? मटक्याचा हफ्ता यापूर्वी पोलीस आणि काही पत्रकारांना मिळत असल्याची माहिती पूढे येत असतानाच आता विरोधी पक्षाच्या राजकीय नेत्यांनाही हफ्ता सुरू केल्याचे बोलले जात आहे. मटकेवाल्या काहिजणांकडून तर अशीही माहिती पुढे येत आहे की, मटक्याच्या धंद्यात काही राज्यातील विरोधी पक्षांच्या नेत्यांची नवीन मटका कंपनी पाय रोवायला पाहत होती, तिला जुन्या मटकावाल्यांकडून विरोध झाल्याने सावंतवाडीत सुरू असलेल्या मटक्यांवर कारवाई करायला भाग पाडले गेले व आता नव्या कंपनीला मटक्याच्या दुनियेत प्रवेश दिल्याने मटक्याविरुद्ध असलेला विरोध मावळला आहे. आणि पुन्हा एकदा मटकाकींग उत्स्फूर्तपणे कामाला लागले आहेत.
एकंदरीत मटक्याच्या, दारूच्या धंद्यांना चार दिवस झालेला विरोध, सावंतवाडीकरांना दाखविलेला कळवळा किती खरा किती खोटा याची प्रचिती काहीच दिवसात यायला लागली आहे. निद्रिस्त असलेला सावंतवाडीकर मात्र रोजरोजच्या नवनवीन राजकारणांपासून नवनवे डावपेच शिकत असल्याचे दिसून येत असून भविष्यातील राजकीय सारीपटावरची खेळी काय असेल हे मात्र पाहणे औत्सुक्याचे असणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा