प्रख्यात समाजसेविका आणि संवेदनशील लेखिका आदरणीय सुधामुर्ती यांचा परवाच एक व्हिडीओ ऐकला. त्यात त्या म्हणाल्या “आपल्या ज्ञानाचा उपयोग चरितार्थासाठी, पैसै कमवण्यासाठी जरुर करावा पण त्याचबरोबर जनतेच्या प्रश्नांसाठी आणि जनकल्याणासाठिही करावा”…
आज माझे मित्र अँड.राकेश भाटकर यानी केलेल्या अतुलनीय कामगिरीमुळे मा.सुधामुर्ती यांचे ते प्रबोधन मला प्रकर्षाने आठवले. गेल्या चार महिन्यापासून.भाटकर हे सातत्याने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेच्या उणीवा बाबत सातत्याने कायदेशीर मार्गाने लढाई लढत आहेत.सिंधुदुर्गपेक्षा रत्नागिरती सुरुवातीपासून कोरोनाचा प्रादुर्भाव जास्त होता आणि आजही आहे.अशावेळी भाटकर यांच्यातील सामाजिक भान असलेला कार्यकर्ता डोळे बंद करून स्वस्थ बसणे शक्यच नव्हते.आपल्या रत्नागिरी या जन्मभूमीबाबत असलेली चिंता त्यांना सतत भेडसावत होती.ते गेली काही वर्षे मुंबई उच्चन्यायालयात प्रँक्टिस करतात.मुंबईत जे माझ्या संपर्कात काही मित्र आहेत ते आम्हा दोघांचेही मित्र. या गंभीर विषयावर चर्चा झाली आणि काही मित्रांच्या सहकार्याने सुमारे चार महिन्यापूर्वी शासनाच्या विरोधात आणि आरोग्यविषयक असुविधाबाबत त्यनी याचिका दाखल केली. त्यावेळी फक्त ही समस्या रत्नागिरी जिल्ह्याचीच नाही तर ती सिंधुदुर्गची पण आहे म्हणून याबाबत सातत्याने ते माझ्या संपर्कात राहून जिल्ह्याची माहिती घेत होते.ही याचिका दाखल करण्यामागचा त्यांचा शुद्ध हेतू हाच होता कि, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा सक्षम व्हावी.सर्वसामान्य व गरीब रुग्णाना वेळीच उपचार व्हावा.दरम्यान नेहमीप्रमाणे काही उत्साही राजकीय मंडळीने श्री भाटकर यांनी याचिका दाखल केल्यानंतर राजकीय श्रेयवादाचा केवीलवाणा प्रयत्न केला..पण आपला उद्देश प्रामाणिक असेल तर अशा गोष्टीही हवेत विरुन जातात.
गेल्या तीन महिन्याच्या सातत्यपूर्ण प्रयत्नानंतर आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होवून कोवीड रुग्णाना दिलासा देणारा निर्णय मा.उच्च न्यायालयाने आपल्या आदेशात दिला.आनंदाची घटना म्हणजे मा.उच्च न्यायालयाने आमचे अँड. मित्र राकेश भाटकर यांना आठ दिवसाच्या आत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा गतिमान आणि सक्षम करण्यासाठी काय उपाययोजना करता येईल याबाबत सुचना करण्यास सांगितले असून याची विशेष जबाबदारी मा.उच्च न्यायालयाने आमचे परममित्र अँड.राकेश भाटकर यांचेवर सोपवली आहे.तसा आदेशच मा.उच्च न्यायालयाने दिलेला आहे.
खरंतर रत्नागिरी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा कार्यक्षम व गतिमान व्हावी यासाठी राकेशजी यांनी जनहित याचिका दाखल केलेली होती मात्र याचा फायदा संपूर्ण राज्याला होणार आहे.या अनुषंगाने आरोग्य खात्यातील अपूरा कर्मचारी वर्ग व त्या अनुषंगाने निर्माण झालेल्या समस्या याबाबतही सरकारला तातडीने निर्णय घेणे भाग पडणार आहे.
सामाजिक भान जपणारे आमचे मित्र अँड.राकेश भाटकर यांनी ही अतुलनीय कामगिरी केली आहे याचा मला सार्थ अभिमान आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग स्वतःच्या आणि कुटुंबाच्या कल्याणासाठी करत असताना समाजहितासाठीही केला पाहिजे याचा आदर्श आपण घालून दिलात याचा माझे मित्र म्हणून मला सार्थ अभिमान आहे….
.. मित्रवर्य राकेश आपले मनःपूर्वक अभिनंदन आणि
आभारही…।
.. अँड.नकुल पार्सेकर.
सावंतवाडी.