सिंधुदुर्ग :
सध्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात 13.7 टक्के आहे. त्यामुळे ही तिसरीच लाट म्हणायला हरकत नाही. या तिसऱ्या लाटेची शक्यता पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने सतर्कता बाळगावी आणि कोरोनाची सगळे नियम पाळून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज पत्रकार परिषदेत केले.
राज्यात 27 आमदार पॉझिटिव्ह आलेत आणि मोठ्या प्रमाणात ओमायक्रोनचे रुग्ण मिळत आहेत. त्यामुळे तिसरी लाट समजावी का असा प्रश्न उदय सामान्यांना विचारला असता त्यांनी या प्रश्नाला उत्तर देताना तिसऱ्या लाटेची शक्यता असल्याचे स्पष्ट केले. नाईट कर्फ्यू कडक केला जाईल. जो कायद्याचे उल्लंघन करेल त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे आजपासून कडक नाईट कर्फ्यू लागू करण्यात आला आहे.
भविष्यात लॉकडाऊनची गरज वाटल्यास व्यापारी, रिक्षा चालक, वाहन चालक सर्व व्यापारी संघटना, पत्रकार, दुकानदार व्यवसायिक यांच्याशी चर्चा करून लॉकडाऊन करण्यात येईल असे उदय सामंत यांनी यावेळी स्पष्ट केले. उद्या संध्याकाळपर्यंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाचवी ते नववी व करावी चे वर्ग बंद ठेवण्याबाबत व शाळा बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल असे पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. आपली जिल्हाधिकाऱ्यांशी बैठक झाली असून या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये अन्न विभागाचा आढावा घेण्यात आला. यामध्ये शाळा बंद ठेवण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे शाळा बंद ठेवावेत की नाही त्यावर पुन्हा एकदा उद्या चर्चा करून संध्याकाळपर्यंत निर्णय होणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 40 हजार विद्यार्थ्यांना कोरोनाची लस देण्यात येणार आहेत. यासाठी मुबलक उपलब्ध असून तब्बल 60 हजार पेक्षा जास्त डोस उपलब्ध असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. सावंतवाडीचे उद्यान चालू आहे ते तत्काळ बंद करण्याचे आदेश आपण मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देणार असल्याचेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले. जे लोक सांगूनही मास्क वापरत नाहीत त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याचे आदेशही दिल्याचे पालकमंत्री यावेळी म्हणाले