You are currently viewing पुणे शहरातील गुणिजन महापरिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवलराज विजयसिंह काळे हे राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समजारत्न पुरस्काराने सन्मानीत

पुणे शहरातील गुणिजन महापरिषदेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवलराज विजयसिंह काळे हे राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समजारत्न पुरस्काराने सन्मानीत

वैभववाडी

शुक्रवार दिनांक २४ डिसेंबर २०२१ रोजी मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी (रजि. ट्रस्ट) संस्थेच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय गुणिजन गौरव महापरिषद आणि पुरस्कार वितरण सोहळा पुणे शहरातील सांस्कृतिक सभागृहात थाटात संपन्न झाला. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातील २५ क्षेत्रांतून पुरस्कारासाठी निवडलेल्या मानकऱ्यांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवलराज विजयसिंह काळे यांचा या सोहळ्यात मानाचा फेटा, मानकरी बॅच, महावस्त्र, गौरवपदक,सन्मानचिन्ह आणि मानपत्र या स्वरूपात राज्यस्तरीय आदर्श युवा महाराष्ट्र युथ आयडॉल समजारत्न पुरस्कार थाटात प्रदान करण्यात आले.2014 पासून चालू असलेल्या सामाजिक,राजकीय,शैक्षणिक क्षेत्रातील कार्याचा आढावा घेत नवलराज काळे यांची या पुरस्कारासाठी निवड झाली होती.
सुप्रसिद्ध राष्ट्रीय कीर्तनकार ह. भ. प. श्री. श्यामसुंदर महाराज सोन्नर हे सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून केलेल्या बीजभाषणात त्यांनी पुरस्कार मानकरी गुणवंतांनी भारतीय संविधानाला अपेक्षित अशी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हि मूल्ये समाजात खोलवर रुजविण्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबविण्याचे आवाहन केले. सुप्रसिध्द साहित्यिक श्री. रमेश आव्हाड हे या समारंभाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. समारंभाचे सूत्रसंचालन सौ. मीनाक्षी गवळी यांनी केले. गुणिजन परिवाराचे पदाधिकारी श्री. प्रकाश सावंत, श्री. लक्ष्मणराव दाते, श्री. अमोलराव सुपेकर यावेळी उपस्थित होते. यावेळी झालेल्या विविध गीतांच्या सादरीकरणात मानकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. समारंभ अध्यक्ष कविवर्य श्री. रमेश आव्हाड यांनी उपस्थितांना ग्लोबल गुणिजन शपथ प्रदान केली आणि गुणिजन संसदेत पुरस्कार प्राप्त मानकऱ्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. सोहळ्याच्या समारोपात तमाम महिला वर्गाने राष्ट्रवंदना सादर करून समारंभाची सांगता केली. वर्ष १९९९ मध्ये स्थापन झालेल्या मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी या गुणिजन संस्थेचा हा २१ व्या वर्षातील पुरस्कार सोहळा होता. “पुरस्कार प्रेरणा देतात; प्रेरणेने राष्ट्र मोठे होते!” या ब्रीदवाक्यावर कार्यरत ही संस्था राज्यस्तरीय, राष्ट्रस्तरीय आणि विदेशस्तरीय पुरस्कार उपक्रम आयोजित करीत असते.

प्रतिक्रिया व्यक्त करा