जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सदस्या लेखिका कवयित्री अख्तर पठाण यांची आठवणी जाग्या करणारी अप्रतिम काव्यरचना
*का मला छळतात, तुझिया आठवणी*
*जखमेसम भळभळतात, तुझिया आठवणीं*॥॥॥॥
*प्रयत्नें मी तयांना सारीते दूरदूर*
*सारख्या माझ्याकडे वळतात, तुझिया आठवणीं*॥॥॥॥
*मी एकांती स्वतःला,घेते जेव्हा कोंडूनी*
*आसवांमधूनी ढळतात, तुझिया आठवणीं*॥॥॥॥
*ज्याक्षणीं मी तयांना जराशी सुखी भासते*
*त्या क्षणीं मजवरी जळतात,तुझिया आठवणीं*॥॥॥॥
*आता वाटते त्या,जातील माझ्या सवेची*
*टाळून ही न टळतात, तुझिया आठवणीं*॥॥॥॥॥
✍🏻 *अख़्तर पठाण*
*(नासिक रोड)*
*मो.:-9420095259*