गझल मंथन, गझल प्राविण्य ग्रुप च्या सदस्या ज्येष्ठ लेखिका, कवयित्री सौ शोभा वागळे यांची अप्रतिम काव्यरचना
हे मना कसे आवरू तुला?
किती चंचल आहेस तू रे!
क्षणा क्षणात दूर दूर जाशी,
कसे जखडू तुला कळेना रे!
मन पाखरू उंच उडे आकाशी
वेसण सुटे माझ्या हातातुनी
कावरी बावरी होऊन जाई मी
पण अलगद येई तू स्वैर भटकुनी.
मन होई कधी तू मवाळ मवाळ
पाहुनी दृष्य दुःख दर्द सभोवताल
कधी नाचे तू थुई थुई आनंदमयी
पाहुनी हर्षभरी हास्य रंग महाल.
राग रोष पाहुनी होई तू कठोर चंडीका
तेव्हा कसे आवरावे तुला मज समजेना
पण होई लगेच तू कोमल लोण्यावाणी
तव तुझ कसे समजावे मज कळेना.
येई कधी आनंदाचे उधाण तुला
तर कधी दुःखाने होरपळून जाशी
अशा वेळी कसे मी तुला सावरावे
मीच हतबल होऊनी जाई कशी!
रूप मनाचे आगळे वेगळे सर्वांचे
प्रकृतिच्या सन्निध्यात बदलत असे
प्रेमळ, दयाळू तर कधी क्रोधी कठोर
थोड्या अवधीत ते बदलतेच कसे?
कधी मनाचा लागेना ठाव ठिकाणा
चेहऱ्यावरचे भाव ही ते ओळखेना
तर चेहराच सांगे भाव मनातले सारे
अशा मनाला कुणीच समजू शकेना.
मना कसे समजाऊ तुला मज कळेना
तू माझ्या हाती काही केल्याच लागेना
तुझ्या मागे धावणे मज कसेच जमेना
तुला मोकळे केल्या शिवाय मला राहवेना.
© शोभा वागळे.
© शोभाची लेखणी.