You are currently viewing संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्त्यांना त्वरित लाभ देण्यात यावा… : काँग्रेस कमिटीचे सचिव महेश अंधारी

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्त्यांना त्वरित लाभ देण्यात यावा… : काँग्रेस कमिटीचे सचिव महेश अंधारी

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात संजय गांधी निराधार योजने अंतर्गत या योजनेमध्ये पात्र असलेल्या लाभार्थ्यांना दरमहा पेन्शन दिली जाते. पण गेल्या चार महिन्यात या लाभार्त्यांना पेन्शन मिळाली नसल्याची माहिती सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव महेश अंधारी यांनी दिली.

संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांची ४०० हुन अधिक प्रकरणे मंजूर होऊन ती स्थानिक तहसीलदार कार्यालयातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयीन विभागात पडून आहेत. या लाभार्थ्यांना कोरोनाच्या काळात वेळेवर पेन्शन रुपी पैसे मिळाले नाहीत तर त्यांचा उदरनिर्वाह होणे फार कठीण आहे. सरकारच्या आदेशानुसार एकही लाभार्थी या पेन्शन पासून वंचित राहणार नाही असे आदेश असतानाही या जिल्ह्यातील लाभार्थी त्यापासून वंचित कसे काय राहिलेत असा सवाल सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव महेश अंधारी यांनी केला आहे.

तरी मंजूर झालेल्या प्रकरणातील लाभार्थ्यांना त्वरित लाभांश देण्यात यावा व नवीन प्रकरणातील त्रुटींचे निरसन करून ती मंजूर करण्यात यावीत व त्यांनाही लाभांश देण्यात यावा अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव महेश अंधारी यांनी उपजिल्हाधिकारी रोहिणी रजपूत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. लाभार्त्यांना लवकरातलवकर लाभांश द्या नाही तर काँग्रेसला काँग्रेसचा दणका दाखवावाच लागेल असा इशारा सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव महेश अंधारी यांनी दिला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा