जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी अनिल देशपांडे यांची अप्रतिम काव्यरचना
एकाएकी धावतच सारे आलेत,
म्हणालेत, “साहेब, काहीतरी जळतंय बघा,
केव्हढा वास येतोय अन धूरही भरलाय!”
…..
माझ्या काळजात धस्स!
…..
तेवढ्यात एकाच मुक्ताफळ,
“जळत असेल कुणाचं तरी हृदय!”
माझ्या मनांत विचार…..
‘म्हणजे, निश्चितच याने जाळलं असणार
कधीतरी, कुणाचं तरी हृदय;
त्याशिवाय कसा त्याला अचूकपणे कळला,
जळणार्या हृदयाचा वास अन धूरही?’
…..
सगळीकडे शोधाशोध, मात्र अगदी सावकाशपणे
कारण शोधणार्यांपैकी कुणाचंही जळत नव्हतं काहीही!
…..
शोधून-शोधून शेवटी,
लागला एकदाचा ठाव त्याचा
अन सार्यांनीच टाकला उसासा
कारण, जळत होती ती दोन लोहखंडाची हृदये
आणि जळत होतं ते त्यांना सांधू पाहणारेच साधनही
…..
काही हृदयं अशीच असतात
जी डागली गेल्याशिवाय सांधलीच जात नाहीत
अन जाणवतही नाही त्यांचं अस्तित्व देखिल!
©अनिल देशपांडे®, गोरेगांव(पूर्व), मुंबई-६५
09830463908