You are currently viewing प्रदूषण मुक्तीसाठी वैभववाडीत जनजागृती सायकल रॅली

प्रदूषण मुक्तीसाठी वैभववाडीत जनजागृती सायकल रॅली

दि.४ जानेवारी रोजी आयोजन.

वैभववाडी

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी आणि माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक ४ जानेवारी,२०२२ रोजी वैभववाडी येथे प्रदूषण मुक्तीसाठी जनजागृती सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
स्वातंत्र्याचे अमृत महोत्सव वर्ष विविध कार्यक्रमांनी सर्वत्र साजरे केले जात आहे. सामाजिक वनीकरण विभाग वैभववाडी आणि माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेच्यावतीने प्रदूषण मुक्तीसाठी जनजागृती सायकल रॅली मंगळवार दिनांक ४ जानेवारी,२०२२ रोजी सकाळी ठीक ९.१५ वा. दत्तमंदिर वैभववाडी ते कासार व्हाळ वाभवे या मार्गावर आयोजित करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला सहाय्यक वनसंरक्षक श्री.योगेश सातपुते व इतर मान्यवर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रदूषणमुक्तीसाठी आयोजित केलेल्या या सायकल रॅलीमध्ये तालुक्यातील विद्यार्थी/विद्यार्थिनी तसेच नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सामाजिक वनीकरण वैभववाडीचे वनपाल श्री.प्रकाश पाटील व माउंटेनिअरिंग असोसिएशन सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट संस्थेचे सचिव प्रा.श्री‌ एस. एन. पाटील यांनी केले आहे.
या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सर्वांना सहभाग पत्र देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी व नाव नोंदणीसाठी प्रा.श्री.एस.एन.पाटील (9834984411) व श्री.प्रकाश पाटील (9422595253) यांच्याशी संपर्क साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा