You are currently viewing राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य शाखा- सिंधुदुर्ग ची स्थापना

राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य शाखा- सिंधुदुर्ग ची स्थापना

राष्ट्रीय /राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची स्थापना महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्षपदी – दशरथ शिंगारे . मुख्य संघटक म्हणून पांडूरंग काकतकर तर सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी शिवराज सावंत व सरचिटणीस पदी संदीप शिंदे यांची निवड महाराष्ट्र राज्यातील राष्ट्रीय व राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र राज्यामध्ये राष्ट्रीय व राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त शिक्षक संघटना या संघटनेची श्रमिक आयुक्त यांच्या मान्यतेने स्थापना झाली .पुणे येथे महाराष्ट्र राज्याच्या राज्य कार्यकारिणी चा पदग्रहण सोहळा संपन्न झाला .या संघटनेचे संस्थापक राज्याध्यक्ष सुभाष जिरवणकर यांच्या अध्यक्षतेखाली सभा संपन्न झाली .तसेच त्यांनी संघटनेचे संस्थापक सदस्य दशरथ शिंगारे सिंधुदुर्ग यांनी महाराष्ट्र भर २० पेक्षा जास्त जिल्ह्यांमध्ये वैयक्तिक संपर्क करून जिल्हा शाखा स्थापन केल्या .त्यांच्या या कामाचा गौरव म्हणून त्यांना राज्य संघटनेचे सरचिटणीस पद किंवा राज्य कार्याध्यक्ष पद साठी नाव सुचविले . शिंगारे यांच्या अनुमतीने व उपस्थित सदस्यांच्या एक मताने राज्य कार्याध्यक्षपदी निवड केली . तर पांडूरंग काकतकर याची मुख्य राज्य संघरक पदी निवड झालेली आहे.हा सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सन्मानच आहे .तसेच राज्य अध्यक्ष यांच्या अनुमतीने सर्व जिल्ह्यांमध्ये जिल्हाध्यक्ष पदीनिवड झालेल्या सर्व जिल्हाध्यक्ष यांना निवडीबाबत व जिल्ह्यामध्ये जिल्हा कार्यकारिणी करण्याबाबतचे अधिकार पत्र दिले .राष्ट्रीय राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य या संघटनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी -शिवराज सावंत तर सरचिटणीस म्हणून संदीप शिंदे यांची निवड झालेली आहे .सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राज्य कार्याध्यक्ष दशरथ शिंगारे यांच्या मार्गदर्शनात व शिवराज सावंत जिल्हाध्यक्ष व संदीप शिंदे सरचिटणीस यांच्या सहकार्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये लवकरच जिल्ह्यात शाखेचा विस्तार करण्यात येणार आहे .या तिघांच्या निवडीबद्दल सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वत्र व राष्ट्रीय . पुरस्कार प्राप्त शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे .

प्रतिक्रिया व्यक्त करा