You are currently viewing संकल्प

संकल्प

 

दाटे मनात उत्कंठा
वर्ष अखेर समीप
क्षण सुखाचे आठवू
करु नवीन संकल्प

कटू आठवांना सारे
आता विसरुन जाऊ
भरु मनात उत्साह
स्वप्न नवे एक पाहू

राहू सदा आशावादी
चिंता भविष्याची सोडू
करु सुखाचा उत्सव
बंध प्रेमाचे हो जोडू

धरु सत्याचीच कास
करु सहाय्य दीनांना
रोज शिकू काहीबाही
वेचू आनंदी क्षणांना

वर्षे येतील जातील
आठवणी चिरंतन
रोज आनंदे जगूया
आहे अमुल्य जीवन

© सायली कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा