You are currently viewing कपल चॅलेंज पोस्ट करताय हे नक्की वाचा..

कपल चॅलेंज पोस्ट करताय हे नक्की वाचा..

पुणे प्रतिनिधी:

 

सध्या फेसबुक, ट्विटरवर वेगवेगळी चॅलेज दिली जात आहे. त्यात बुधवारपासून फेसबुकवर असंच एक #CoupleChallenge ट्रेंड सध्या सोशल मीडियावर सुरु झाला आहे. त्यात पतीपत्नीने आपले फोटो टाकण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याला लोकांनी जबरदस्त प्रतिसाद दिला आहे. लोक पतीपत्नीचे एकत्रित फोटो फेसबुकवर शेअर करत आहेत. अनेकजण आपल्या पहिल्या भेटीपासून ते लग्नापर्यंतचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. तसेच वेगवेगळ्या ठिकाणी सहलीला गेले असताना काढलेले, तसेच लग्नाचा वाढदिवस अशा प्रसंगी काढलेले फोटो फेसबुकवर शेअर होताना दिसत आहे.

याच शेअर होणाऱ्या  फेसबुक  पोस्टला

सायबर पोलिसांनी दिलाय सावधगिरीचा इशारा; कपलचा होईल ‘खपल’ चॅलेंज

सध्या फेसबुकवर कपल चॅलेज ठेवण्यात आले असून त्याला लोकांकडून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला जात आहे. याबाबत पुणे सायबर पोलिसांनी सावधगिरीचा इशारा दिला आहे. तुम्ही पाठविलेल्या फोटोचा गैरवापर होऊ शकतो, त्यातून तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागण्याची शक्यता असल्याचे ट्विट सायबर पोलिसांनी केले आहे.फोटो मार्फिंग केले जातात़ पॉर्न साईटवर टाकले जातात; फोटो भलत्या लोकांच्या हाती लागले तर त्यातून कुटुंबामध्ये चारित्र्याचा संशय घेतला जाऊ शकतो

प्रतिक्रिया व्यक्त करा