You are currently viewing औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करण्यासाठी 31 डिसेंबर पर्यंत ऑनलाईन अर्ज करावेत

सिंधुदुर्गनगरी

सन 2022-23 करिता कायम विना अनुदान तत्वावर नवीन खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्था सुरु करणे आणि विद्यमान खाजगी औ. प्र.संस्थांमध्ये नवीन व्यवसाय, जादा तुकडीवाढ, व्यवसाय बदल करण्याकरिता ऑनलाईन अर्ज करण्याची संचालनालयाचे पोर्टल http://vti.dvet.gov.in वर दि.9 डिसेंबर ते दि 31 डिसेंबर 2021 पर्यंत सुरु करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

          औ. प्र. संस्‍थाना किमान 04 व्‍यवसाय अभ्‍यासक्रम व 8 तुकड्या सुरु करणे बंधनकारक करण्‍यात आलेले आहे. त्‍यातील किमान एक व्‍यवसाय अभियांत्रिकी, आणि एक व्यवसाय न्यू एज/Industry4.0 आवश्यक असल्याने काही संस्थांना या निकषानुसार अर्ज करता आला नाही . दि 1 जुलै ते 31 ऑगस्ट 2021 दरम्यान सन 2022-23 करिता काही  संस्थांची सर्व तयारी असून देखील  संस्था अर्ज करण्यात इच्छुक असूनही पोर्टल बंद असल्याने अर्ज करु शकले नाहीत. अशी माहिती रमण पाटील जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी सिंधुदुर्ग यांनी दिली .

प्रतिक्रिया व्यक्त करा