You are currently viewing विजय चव्हाण यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार प्रदान

विजय चव्हाण यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कार प्रदान

इचलकरंजी

मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल वस्त्रनगरीतील सुपुत्र विजय चव्हाण यांना राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे येथे झालेल्या
एका शानदार समारंभात या पुरस्काराचे वितरण सुप्रसिद्ध प्रबोधनकार शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश रसाळ ,डॉ. शुभदा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.

वस्त्रनगरीचे सुपुत्र विजय शंकर चव्हाण यांनी स्वच्छता दूत गजानन महाजन गुरुजी यांच्या कार्याची प्रेरणा घेवून
कोरोना व लाँकडाऊनच्या काळात गांव बंद असताना पंचगंगा नदी केंदाळमुक्त करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.याशिवाय पंचगंगा नदी प्रदूषणमुक्त रहावी ,यासाठी देखील विविध माध्यमातून प्रयत्न सुरु ठेवला आहे.त्यांच्या या निरपेक्ष पर्यावरण रक्षणाच्या
सामाजिक कार्याची दखल घेवून त्यांची मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमीच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श कार्यगौरव समाजरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. या पुरस्काराचे वितरण नुकताच पुणे येथे झालेल्या राज्यस्तरीय गुणीजन गौरव महापरिषदेच्या शानदार समारंभात सुप्रसिद्ध प्रबोधनकार शामसुंदर महाराज सोन्नर आळंदीकर ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश रसाळ ,डॉ. शुभदा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना देखील विविध पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
या समारंभास इंटरनँशनल सोशल आयकाँन तेजस शेळके यांच्यासह विविध मान्यवर व नागरिक उपस्थित होते. या पुरस्काराबद्दल विजय चव्हाण यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा